---Advertisement---

का चेन्नई सुपर किंग्सकडून धोनीला मिळतो इतका सन्मान? माजी क्रिकेटरने सांगितले कारण

On: गुरूवार, ऑक्टोबर 29, 2020 9:14 PM
---Advertisement---

आयपीएल २०२०मध्ये एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचे प्रदर्शन खूप खराब राहिले. त्यामुळे चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपर्यंत सर्वांनी धोनीवर टीका केली. तरीही चेन्नईच्या संघमालकांनी आपल्या कर्णधारावर विश्वास दाखवला आणि पुढील वर्षी तोच संघाचा कर्णधार असल्याचे स्पष्टही केले. आता भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरनेही धोनीच्या नेतृत्त्वपदाविषयी मोठे वक्तव्य केले आहे.

संघमालकांकडून मिळतो सन्मान

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना गंभीर म्हणाला की, “चेन्नई सुपर किंग्सच्या मालकांचे आणि कर्णधार धोनीचे नाते खूप घट्ट आहे. त्याने चेन्नईला तीन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. तसेच मुंबई इंडियन्सनंतर चेन्नईला आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनवले आहे. म्हणून संघमाकांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी धोनीला सर्व गोष्टींचे स्वातंत्र्य दिले आहे. याच कारणामुळे त्याला संघ मालकांकडून खूप सन्मानदेखील मिळतो.”

धोनीच्या भविष्याची दिली माहिती

“जर धोनी २०२१ साली चेन्नईचा कर्णधार बनला, तर मला थोडेही आश्चर्य वाटणार नाही. खरं तर त्याने त्याची इच्छा असेपर्यंत खेळायला हवे. पुढील वर्षी तोच चेन्नईच्या नेतृत्त्वाची सूत्रे सांभाळेल. पण तो यावर्षीच्या संघापेक्षा खूप वेगळ्या आणि मजबूत संघासह मैदानावर उतरेल,” असे धोनीच्या भविष्याविषयी बोलताना गंभीर म्हणाला.

गुणतालिकेत शेवटचे स्थान

एमएस धोनी चेन्नई संघाचे यंदाचे प्रदर्शन चांगले राहिले नाही. त्यांनी आतापर्यंत हंगामातील १२ सामने खेळले असून त्यातील केवळ ४ सामने जिंकले आहेत. तर उर्वरित ८ सामन्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे सर्वात कमी ८ गुणांसह त्यांचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून धोनीची सीएसके यावर्षी ठरली सुपर-डुपर फ्लॉप; दिग्गजाने सांगितले कारण

जोफ्रा म्हणतोय, “आयपीएलच्या ‘या’ दिवसांना मी कंटाळलोय, मला मुक्त करा”

आम्ही पण चकित झालोय!! IPLच्या १२ वर्षांच्या इतिहासात अन् ८०० सामन्यांमध्ये न घडलेली गोष्ट यंदा घडलीये

ट्रेडिंग लेख-

Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट

SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर

हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---