आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाविषयी मोठे वक्तव्य केले आहे. नुकतेच विराटने म्हटले होते की, यंदाचा आरसीबी संघ २०१६ नंतर पहिल्यांदाच इतका संतुलित झाला आहे. यावर आता गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली आहे. Gautam Gambhir Talks About Virat Kohli
स्टार स्पोर्ट्सने गंभीरला प्रश्न विचारला की, विराटच्या वक्तव्यानुसार यावर्षी आरसीबी संघ जास्त संतुलित असल्याचे दिसत आहे का?. यावर उत्तर देत गंभीर म्हणाला की, “विराट २०१६पासूनच आरसीबी संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे जर संघाचे संतुलन व्यवस्थित नव्हते, तर त्याने यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे होते. ”
“मला अजूनही वाटते की, आरसीबीची फलंदाजी फळी जास्त मजबूत आहे. पण, यावर्षी त्यांची चांगली गोष्ट ही आहे की, त्यांच्या गोलंदाजांना यावर्षीचे ७ सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळायचे नाहीत. त्यांना अबु धाबीसारख्या मैदानावर खेळायचे आहे. त्यामुळे उमेश यादव आणि नवदिप सैनी यांच्यासारखे गोलंदाज यंदा दमदार प्रदर्शन करतील. तसेच, ख्रिस मॉरिसच्या येण्याने संघाची गोलंदाजी फळी मजबूत झाली आहे,” असे पुढे बोलताना गंभीरने म्हटले.
यावर्षीच्या आरसीबी संघात विराट, एबी डिविलियर्सबरोबर अनेक धुरंदर फलंदाजांची भरमार आहे. संघात मोईन अली, ऍरॉन फिंच, शिवम दुबे, पार्थिव पटेल, जोश फिलीप असे दमदार फलंदाज आहेत. तर, ऍडम झम्पा, डेल स्टेन, शादाब खान, युजवेंद्र चहल असे गोलंदाजही संघात उपलब्ध आहेत. त्यामुळे आरसीबीच्या यंदा आयपीएल ट्रॉफी पटकावण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
आयपीएल २०२०ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. हा हंगाम ५३ दिवस खेळला जाणार आहे. त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल२०२० मध्ये १५.५० कोटींची किंमत मिळालेल्या खेळाडूसह खेळण्यास केकेआरचा हा गोलंदाज उत्सुक
ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी; हा स्टार खेळाडू खेळणार दुसऱ्या वनडे सामन्यात
विराट कोहली हा तर बिघडलेला क्रिकेटपटू, आता सुधारलाय; पहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख-
दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार
इरफानला एकाच ओव्हरमध्ये २४धावा कुटणारा ‘ज्युनियर सेहवाग’ आयपीएल गाजवायला सज्ज