आयपीएल 2023 हंगाम 31 मार्च रोजी सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही काही प्रमुख संघ आणि खेळाडूंवर चाहत्यांची नजर असेल. मागच्या आही हंगामांमध्ये भारतीय दिग्गज केएल राहुल आयपीएलमध्ये तुफान कामगिरी करताना दिसला आहे. पण यावर्षीच्या हंगामात त्याच्या प्रदर्शनावर विशेष लक्ष असेल. राहुल त्याच्या सुमार खेळीमुळे मागच्या काही महिन्यांमध्ये चांगलाच चर्चेत राहिला. पण भारतीय दिग्गज गौतम गंभीर याने राहुलवर टिका करणाऱ्यांवर नाव न घेता निशाणा साधला.
केएल राहुल (KL Rahul) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात (17 मार्च) भारतासाठी मॅच विनर ठरला. राहुलच्या 75 धावांच्या जोरावर भारताने हातातून निसटलेल्या सामन्यात पुनरागमन केले आणि विजय मिळवला. पण त्याआधीच्या काही मिहन्यांमध्ये राहुलचे प्रदर्शन निराशाजनक होते. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत राहुलला खेळण्याची संधी मिळाल्यानंतर अनेकांती संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले. माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी देखील राहुलच्या प्रदर्शनावर जोरदार टीका केली होती. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये राहुलच्या बॅट शांत असल्याचे पाहायला मिळाल्यानंतर त्याला तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतून वगळण्यात आले.
कसोटीत अपयशी ठरल्यानंतर राहुलने वनडेत मात्र जोरदार पुनरागमन केले. आगामी आयपीएल हंगामात देखील त्याच्याकडून लखनऊ सुपर जायंट्सच्या चाहत्यांना चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. अशातच लखनऊचा मेंटोर आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने राहुलला पाठिंबा दिला. राहुलला होत असलेल्या टीकांमुळ गंभीरने आश्चर्य व्यक्त केले. राहुलवर कुठल्याही प्रकारचा दबाव नसल्याचेही गांभीर यावेळी म्हणला.
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गंभीरने भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटूंवर देखील आरोप केले. गंभीरच्या मते या माजी खेळाडूंना कायम मसाला हवा असतो. तसेच नेहमी चर्चेत राहण्यासाठी माजी खेळाडू अशी विधाने देत असता, असेही गंभीर यावेळी म्हणाला. अनेकांच्या मते गंभीरने अप्रत्यक्षपणे वेंकटेश प्रसादांवर निशाणा साधला आहे, ज्यांनी राहुलला संघातून वगळण्याची मागनी केली होती. दरम्यान, राहुलच्या नेतृत्वात लखनऊ सुपर जायंट्सने मागच्या वर्षी आयपीएल गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले होते.
(Gautam Gambhir targeted former cricketers who criticized Rahul)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“टप्प्याचा विचार करू नकोस फक्त वेगात चेंडू टाक”, उमरानला संघसहकाऱ्याचा सल्ला
सॅमसनवर अन्याय होतोय का? वनडेत दर्जा कामगिरी करूनही संघ व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष