भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर हा नेहमीच आपल्या परखड मतासाठी ओळखला जातो. गौतम गंभीर महत्वाच्या ठिकाणी आपली भुमिका बेधडकपणे मांडतो. आता भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याच्याबद्दल गंभीरने मोठे वक्तव्य केले आहे. कोणत्याही खेळाडूवर लक्ष केंद्रित करणे प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांचे काम असते. गंभीरच्यामते प्रशिक्षकाचे काम फक्त थ्रोडाउन देणे नसते, त्यांनी खेळाडूची काळजी घेत त्याला योग्य दिशा देखील दाखवली पाहिजे.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला 2019 साली डोपिंगमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर निलंबितही करण्यात आले होते. गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या मते पृथ्वी शॉ सारख्या चांगल्या खेळाडूला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्रशिक्षक आणि कोचिंग स्टाफची आहे, त्यांनी त्याला चूकीच्या मार्गावर जाऊ नाही दिले पाहिजे. माध्यमांशी बोलताना गंभीर म्हणाला की,”कोच त्या ठिकाणी कशासाठी आहेत? निवडकर्ते त्या ठिकामी कशासाठी आहेत. ते तिकडे फक्त संघाची निवड आणि थ्रोडाऊन करण्यासाठी नाहीयेत, त्यांचे काम आहे की खेळाडूला सामन्यासाठी तयार करावे. शेवटी निवडकर्ते, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन खेळाडूंच्या मदतीसाठी असते. आपल्या सर्वांना माहितीये की पृथ्वी शॉकडे किती गुणवत्ता आहे. तसेच त्याला योग्य मार्गावर आणणे हे व्यवस्थापनाचे काम आहे. ”
पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आला आहे. आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय पुनरागमानाची संधी मिळेल अशी अपेक्षा पृथ्वी शॉ याची होती. मात्र, त्याला संघात स्थान मिळाले नाही. शॉने आपला शेवटचा सामना 25 जुलै 2021 या दिवशी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून संधीची वाट बघत आहे. पृथ्वी शॉ सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत आहे. याआधी त्याने मुंबई संघाचे नेतृत्व देखील केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने चांगली कामगिरी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनी कुटुंबाने नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गाठली दुबई, मुलीसोबतचा व्हिडिओ आला समोर
“मला जीवे मारणार होते”, रमीझ राजांचा धक्कादायक खुलासा