---Advertisement---

गौतम गंभीरने तडफातडफी घेतली राजकारणातून निवृत्ती, आता दिसणार फक्त क्रिकेटच्या मैदानावर; घ्या जाणून काय आहे प्रकरण

On: शनिवार, मार्च 2, 2024 12:49 PM
Gautam-Gambhir
---Advertisement---

भारतीय संघाचा माझी खेळाडू गौतम गंभीर क्रिकेटपेक्षा पण वादांसाठी जास्त ओळखला जातो. तसेच गौतम गंभीरने आज अचानक राजकारणाच्या पीचवरुन निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयाच अनेकांना आश्चर्य देखील वाटलं आहे. कारण राजकारणात येऊन गौतम गंभीरला अजून पाच वर्षही झालेली नाहीत. तर गौतम गंभीरने अचानक राजकीय सन्यास का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. क्रिकेटच मैदान गाजवल्यानंतर गंभीरने राजकारणाच्या पीचवर दमदार एन्ट्री केली होती.

याबरोबरच माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. तसेत गौतम गंभीर यावर म्हणाला आहे की, मला माझा वेळ क्रिकेटला द्यायचा आहे, त्यामुळे मला राजकीय जबाबदारीतून बाजुला जात आहे. अशा परिस्थितीत गौतम गंभीर क्रिकेटच्या कोणत्या जबाबदाऱ्यांशी निगडीत बोलत आहे हा मोठा प्रश्न देखील सध्या निर्माण झाला आहे.

अशातच येत्या काही महिन्यांत आयपीएलसोबतच लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. अशा परिस्थितीत गंभीरने निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असते तर कदाचित तो क्रिकेटला वेळ देऊ शकला नसता, त्यामुळेच गंभीरने  ही घोषणा केली आहे. तर आयपीएल 2023 मध्ये गौतम गंभीर हा लखनऊ सुपरजायंट्सचा मार्गदर्शक होता, परंतु आयपीएल 2024 पूर्वी गंभीरने पुन्हा एकदा आपली जबाबदारी बदलली असून तो त्याचा जुना संघ कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात सामील झाला आहे.

अशा परिस्थितीत सोशल मिडियावरती गौतम गंभीर चर्चेत आला आहे. तसेच त्याने केलेल्या पोस्टमुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. तसेच स्वत:ला राजकीय जबाबदारीतून मुक्त केल्याची चर्चा देखील होत आहे. त्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अर्थ लावत आहेत. गंभीरच्या वक्तव्याचा अर्थ त्याने राजकारण पूर्णपणे सोडण्याचा निर्णय घेतला आहे की त्याला तूर्तास ब्रेक घ्यायचा आहे, याची माहिती अजूनही भेटू शकलेली नाही.

दरम्यान, गंभीरने पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. तर मला क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे, त्यामुळेच मला हा निर्णय घ्यावा लागला आहे. तसेच मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी आदरणीय नरेंद्र मोदी आणि आदरणीय अमित शहा यांचे मनापासून आभार मानू इच्छितो.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---