लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (०१ मे) आयपीएल २०२२चा ४५वा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना लखनऊने शेवटच्या चेंडूवर ६ धावांनी जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ३ विकेट्सच्या नुकसानावर १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीला ७ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावाच करता आल्या. धाकधूक वाढवलेला हा सामना लखनऊने शेवटच्या चेंडूवर खिशात घातला, ज्यानंतर लखनऊ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर खूप आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाला.
लखनऊच्या (LSG vs DC) १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती. लखनऊकडून घातक अष्टपैलू मार्क्स स्टॉयनिस हे षटक टाकत होता. दिल्लीकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल फलंदाजी करत होते. त्यांनी मिळून २१ धावा काढण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
कुलदीपने स्टॉयनिसच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर दुसरा चेंडू वाईड गेला. पुढे दुसरा चेंडू पुन्हा फेकला गेला आणि कुलदीपने त्यावर एक धाव घेतली. मग अक्षरने पुढील ३ चेंडू डॉट खाल्ले व शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. परंतु त्याचा हा षटकार संघाला विजय मिळवून देण्यास पुरेसा नव्हता. परिणामी लखनऊने दिल्लीला ६ धावा (Lucknow Beats Delhi) राखून पराभूत केले.
लखनऊने विजय मिळवल्यानंतर त्यांच्या डगआऊटमध्ये आनंदाची लहर पसरली होती. डगआऊटमध्ये बसलेले खेळाडू आणि प्रशिक्षक संघाच्या विजयाचा जल्लोष साजरा करू लागले. अशात लखनऊचा मार्गदर्शक गंभीरनेही (Gautam Gambhir) विजयाचा आनंद साजरा केला. परंतु आनंदाच्या भरात तो खूपच जास्त आक्रमक झाला आणि त्याचा स्वत:वरील ताबा सुटला. त्याच्या तोंडातून अपशब्द (Gautam Gambhir Aggressive Reaction)निघाले. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
An elated dugout as @LucknowIPL win by 6 runs against #DelhiCapitals.#TATAIPL #DCvLSG pic.twitter.com/EVagwBHHVA
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहते गंभीरच्या या वागणूकीबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी गंभीरचे असे शिवीगाळ करणे खेळ भावनेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी भावनेच्या ओघात असले होते असे म्हटले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा मोहसिन खान आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर
हार्दिक १०० वा आयपीएल सामना जिंकून भलताच खुश; आरसीबीविरुद्धचा विजय ‘या’ लोकांना समर्पित
ललितने रोखले राहुलचे तिसरे शतक; स्पायडरमॅन बनून यादवने घेतला शानदार झेल