भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने काही दिवसांपुर्वी भारतीय संघाच्या प्रशिक्षण स्टाफवरती प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी युवराजने भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यात टी२० क्रिकेटमधील युवा खेळाडूंची मदत करण्याची क्षमता आहे का? कारण, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकही टी२० सामना खेळला नव्हता आणि त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या या स्वरुपात येणाऱ्या दबावाचाही अनुभव नाही, असे युवराजने म्हटले होते.
मात्र, युवराजच्या या वक्तव्यावर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर अजिबात सहमत नाही. त्याचे या मुद्द्यांवरील विचार हे युवराजच्या विचारांच्या एकदम उलट आहेत. Gautam Gambhir’s Reply To Yuvraj Singh Statement About Vikram Rathour.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड शोमध्ये बोलताना गंभीर म्हणाला की, “एक यशस्वी टी२० फलंदाजी प्रशिक्षक बनण्यासाठी तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असण्याची अजिबात आवश्यकता नाही. टी२० क्रिकेटसाठी वेगळ्या फलंदाजी प्रशिक्षकाची गरज नाही. कारण प्रशिक्षक हे खेळाडूंची सकारात्मक मानसिकता वाढवण्यासाठी असतात. जेणेकरुन खेळाडू त्याच्या स्वाभाविक पद्धतीने खेळू शकेल. जगातील कोणताही प्रशिक्षक तुम्हाला लॅप शॉट कसा खेळायचा, रिव्हर्स शॉट कसा खेळायचा हे शिकवू शकणार नाही.”
गंभीरने हे स्पष्ट केले की, “जरी प्रशिक्षक बनण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असण्याची गरज नसली, तरी एक चांगला निवडकर्ता बनण्यासाठी हा अनुभव असणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही जास्त क्रिकेट खेळला नसाल. तर तुम्हाला हे कळणार नाही की, कोणत्या परिस्थितीत कोणता खेळाडू जास्त प्रभावी ठरेल आणि परदेशातील मैदानावर विजय मिळवण्यासाठी कोणत्या खेळाडूला संधी द्यायला पाहिजे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
आपल्याच नात्यातील मुलीवर झाले होते सेहवागला प्रेम, घरच्यांच्या…
आयपीएलबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी, वेळही जवळपास ठरल्यात जमा
अविवाहित, नवविवाहित व पिता असताना धोनीने जिंकल्या आहेत ३ आयपीएल…






