भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंत (Rishbh Pant) मॅंचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी दुखापतग्रस्त झाला. तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी त्याला जबरदस्तीनं फलंदाजीस उतरावं लागलं. पंत दुखापतीच्या वेदनेत असूनही मैदानात खेळताना दिसला, हे पाहून दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) नाराज झाले. मॅंचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी समालोचनादरम्यान गावसकरांनी ICC च्या एका मोठ्या नियमावर थेट सवाल उपस्थित केला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही गावसकरांच्या मताला पाठिंबा दिला.
आयसीसी (ICC) ने क्रिकेटमधून ‘रनर’ चा नियम काढून टाकला आहे. त्यानंतर फक्त डोक्यावर इजा झाल्यास “कन्कशन सब्स्टिट्यूट”ची परवानगी दिली, पण इतर कोणत्याही दुखापतीसाठी कोणताही पर्यायी खेळाडू देता येत नाही. त्यामुळेच रिषभ पंतला वेदनेत असूनही फलंदाजी करावी लागली. यावर सुनील गावसकरांनी सोनी स्पोर्ट्सवर म्हटलं, मला कायम वाटतं की ‘लाईक फॉर लाईक रिप्लेसमेंट’ ही अपंगत्वासाठी दिली जाते. जर तुम्ही शॉर्ट पिच चेंडूंना तोंड देऊ शकत नाही, तर कसोटी क्रिकेट खेळू नका, जा टेनिस किंवा गोल्फ खेळा. तुम्ही अशा खेळाडूचा पर्याय देता जो चेंडूला तोंड देऊ शकला नाही म्हणून इजा होते.
पंतच्या दुखापतीचा दाखला देत गावसकर म्हणाले, इथे स्पष्टपणे दुखापत झाली आहे. त्यामुळे इथे रिप्लेसमेंट मिळायला हवी. एक स्वतंत्र समिती असावी, ज्यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञांचाही समावेश असावा. त्या समितीला रिप्लेसमेंटचा निर्णय घेण्याचा अधिकार हवा. इंग्लंडच्या मायकेल वॉननेही (Micheal Waun) गावसकरांना पाठिंबा दिला. त्याचंही मत आहे की, मैदानात झालेल्या इजेसाठी पर्यायी खेळाडू मिळायला हवा. अन्यथा विरोधी संघाला फक्त 10 खेळाडूंविरुद्ध खेळावं लागेल.






