भारतीय संघाकडे भरपूर महान फलंदाजांचा भरणा राहिला आहे. भारतीय फलंदाजांनी जगभरात आपल्या फलंदाजीने अनेक विक्रम केले आणि अजूनही भारतीय फलंदाज अनेक विक्रम करत आहेत. परंतु भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असा एक फलंदाज झाला, ज्याने भारतीय फलंदाजीचा चेहरामोहरा बदलाल. यात काही शंका नाही की, ते दुसरे तिसरे कोणी नसून ‘लिटल मास्टर’ सुनील गावसकर आहेत.
आपल्या पहिल्याच मालिकेत गावसकरांनी ७०० धावा केल्या होत्या. तसेच, कसोटी क्रिकेटमध्ये १०००० धावा करणारे ते पहिले खेळाडू आहेत. सुनील गावसकरांनी आपले आणि देशाचे नाव त्याकाळी खूप गाजवले होते. परंतु, आजच्या दिवशी म्हणजे ७ जून, त्यांचा कारकिर्दीतला काळा दिवस म्हटला तरी चालेल. कारण आजच्या दिवशी त्यांनी एक अशी खेळी खेळली होती, ज्याचा कोणताही भारतीय समर्थक विचार करू शकत नाही.
तब्बल ४६ वर्षांपूर्वी म्हणजेच १९७५ रोजी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली होती. या विश्वचषकात भारतीय संघाने भाग घेतला होता. भारतीय संघाचा पहिला सामना आयोजक इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्समध्ये झाला होता. या सामन्यात इंग्लंड संघाने ६० षटकात एकूण ३३४ धावा केल्या होत्या. इंग्लंड संघाकडून डेनिस एमिस यांनी १३७ धावांची खेळी केली होती.
प्रत्युत्तरात भारतीय संघाकडून सलामीला एकनाथ सोलकर आणि सुनील गावसकर उतरले होते. भारतीय संघाला ३३५ धावांचा पाठलाग करण्यासाठी ताबडतोब सलामीची गरज होती. परंतु, भारतीय सलामीवीरांनी अतिशय हळू सुरुवात केली होती.
भारतीय संघाने ६० षटकात केवळ १३२ धावा केल्या होत्या. त्यामध्ये भारतीय संघाचे ३ फलंदाज बाद झाले होते. भारतीय संघाकडून सर्वाधिक धावसंख्या ३७ होत्या आणि त्या धावा गुंडप्पा विश्वनाथ यांनी केल्या होत्या. त्यांनी ५९ चेंडूचा सामना करत ३७ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हा सामना २०२ धावांनी गमावला होता.
या सामन्यातील चकित करणारी गोष्ट म्हणजे, सुनील गावसकरांनी १७४ चेंडूंचा सामना करून सुद्धा फक्त ३६ धावा केल्या आणि पूर्ण सामन्यात ते नाबाद राहिले होते. या खेळीत त्यांचा फलंदाजीतून केवळ एक चौकार आला होता. त्यांचा स्ट्राईक रेट २०.६९ होता, जी त्यांची एकदिवसीय सामन्यातील सर्वात हळू खेळली गेलेली खेळी राहिली. सुनील गावस्करांच्या नावावर अनेक मोठ-मोठे विश्वविक्रम आहेत. परंतु, त्यांच्या चाहत्यांना हा विक्रम कधीही न आवडणारा असा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशी खेळाडूची बालिश चूक, चेंडू पकडण्याच्या नादात विसरला बाउंड्री अन् स्वत:चं केलं हसू
कमालचं म्हणायची; एक भारतीय वर्षात जितके कमावतो, तितकेच केवळ ६ तासात कमावतो ‘हिटमॅन’!
ओहो! आपल्या बायोग्राफीमध्ये ‘या’ अभिनेत्याने साकारावी भूमिका, तर हिरोईन असावी कॅटरिना; चहलची इच्छा