घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित घाटकोपर कबड्डी प्रिमीयर लीग पर्व दुसरेचा दुसरा दिवस रंगला तो अटीतटीच्या सामन्यांनी. कै दत्ताजी साळवी क्रीडांगण, भटवाडी, घाटकोपर येथे सुरू असलेल्या या लिगच्या दुसऱ्या दिवशी देवांश सुपर किंग विरुद्ध अनिश्री चॅलेंजर्स यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात देवांश सुपर किंगने २३-२२ असा जिंकत पहिला विजय मिळवला.
देवांश सुपर किंग कडून चढाईत करण कोकरेने चांगला खेळ केला तर किशोर गवळीने अष्टपैलू खेळ केला. अनिश्री चॅलेंर्ज कडून विघ्नेश चौधरी ने चांगला खेळ दाखवला पण संघसला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले.
रॉयल पंतनगर विरुद्ध रणपिसे रॉयल झालेल्या दुसऱ्या अटीतटीच्या लढाईत रणपिसे रॉयलने ३०-२९ असा विजय मिळवला. रणपिसेकडून अक्षय परब व मयूर जाधवने चांगला खेळ केला. घाटकोपरची आई महाकाली संघाने आई शिंब्रादेवी वॉरिअर्स वर २७-१८ अशी मात केली.
अनिश्री चॅलेंजर्स विरुद्ध दिल्ली योद्धा यांच्यात अ गटात चुरशीची लढत बघायला मिळाली. अनिश्री चॅलेंजर्सने हा सामना २५-२२ असा विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. भटवाडी साई दर्शन पॅकर्स विरुध्द रणपिसे रॉयल ही लढत भटवाडी संघाने २५-१६ आता विजय मिळवला.
दुसऱ्या दिवशी झालेल्या शेवटच्या सामन्यात आर्यन वॉरिअर्स विरुद्ध राजे चंद्रराव वारियर्स यांच्यात अटीतटीची लढत झाली. आर्यन वॉरिअर्स कडून आदेश सावंत व सिद्धेश पांचाळने चांगला खेळ करत संघाला २२-२१ असा विजय मिळवून दिला.
लीगमध्ये प्रत्येक सामन्यात उत्कृष्ठ खेळाडूचे पारितोषिक देण्यात येते दुसऱ्या दिवशीचे सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक किशोर गवळी ( देवांश ), अभिषेक पडेलकर (रॉयल पंतनगर), प्रभू मुदलियार (घाटकोपरची आई महाकाली), विघ्नेश चौधरी (अनिश्री), विक्रांत नार्वेकर (रणपिसे रॉयल), आदेश सावंत (आर्यन) यांना मिळाले.
लीग करीता असलेल्या नियमाच्या चाकोरीत खेळताना खेळाडूं बरोबर प्रशिक्षक व व्यवस्थापक यांची देखील कसोटी लागत आहे, कुमार गटाचा खेळाडू देखील प्रथम श्रेणी व व्दितीय श्रेणी संघाच्या खेळाडूं बरोबर एकत्र एकाच मैदानात खेळून आपला खेळ उंचावत आहेत.
दुसऱ्या दिवशी घाटकोपर पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या सन्मानीय सौ राखी ताई जाधव, अहमदनगर जिल्हा कबड्डी असोचे पदाधिकारी , विभागातील मान्यवर संस्थेनेचे अध्यक्ष उपस्थित होते त्यांचा प्रतिष्ठान तर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.
दुसऱ्या दिवसाचे संक्षिप्त निकाल:
१) देवांश सुपर किंग २३ विरुद्ध अनिश्री चॅलेंजर्स २२
२) रॉयल पंतनगर २९ विरुद्ध रणपिसे रॉयल ३०
३) घाटकोपरची आई महाकाली २७ विरुद्ध आई शिंब्रादेवी वॉरिअर्स १८
४) दिल्ली योद्धा २५ विरुद्ध अनिश्री चॅलेंजर्स २८ गुण
५) भटवाडी साई दर्शन पॅकर्स २५ विरुद्ध रणपिसे रॉयल १६
६) आर्यन वॉरिअर्स २२ विरुद्ध राजे चंद्रराव वॉरिअर्स २१
महत्त्वाच्या बातम्या –
–उदयोन्मुख खेळाडूंसाठी खेलो इंडिया स्पर्धा ही सुवर्णसंधी
–घाटकोपर कबड्डी प्रीमियरल लीग चे दणक्यात उदघाटन !!