पुणे – घोरपडी तमिळ युनायटेड संघाने पीडीएफए फुटबॉल लीगमधील सुपर ८ गटातून विजयी आगेकूच कायम राखली. त्याचवेळी द्वितीयश्रेणीत अगदी अखेरच्या क्षणी सनी डेज रेलिगेशनपासून वाचले. महिला लीगमध्ये अस्पायरने गुणतक्त्यात आघाडी घेत आपले वर्चस्व राखले.
एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात घोरपडी तमिळ युनायटेड संघाने पिछाडीवरून राहुल एफए संघाचा २-१ असा पराभव केला. आनंद शेंडेने तिसऱ्याच मिनिटाला राहुल एफए संघाला आघाडीवर नेले होते. पण, त्यांना ही आघा़डी टिकवता आली नाही. सामन्याच्या २४व्या मिनिटाला सॅमसन पिल्लेने घोरपडीला बरोबरी साधून दिली. त्यानंतर उत्तरार्धात ४०व्या मिनिटाला नेहार पिल्लेने विजयी गोल केला.
द्वितीय श्रेणीतील पदावनतीच्या (रेलिगेशन) प्ले-ऑफ लढतीत सनी डेजने विजयासह आपले आव्हान राखले. त्यांनी सुखाई क्लबचा ३-१ असा पराभव केला. सोहेल शेखने दुसऱ्याच मिनिटाला गोल केला. त्यानंतर तोच वेग कायम ठेवत सनी डेजने ५व्या मिनिटाला दुसरा गोल केला. हा गोल विनायक अनमोल याने केला. पूर्वार्धातच प्रदीप काळे याने २८व्या मिनिटाला गोल करून पिछाडी भरून काढली. पण, त्यांचे प्रयत्न तेवढ्यापुरतेच ठरले. उलट उत्तरार्धात चिराग जवरानी याने ५०व्या मिनिटाला आणखी एक गोल करून सनी डेजचा विजय साकार केला.
महिला गटात अस्पायर एफसी संघाने अ गटातून आघाडी घेतली. त्यांनी उत्कर्ष क्रीडा मंच ब संघाचा २-० असा पराभव केला. दोन्ही गोल सिंग लॅम हुआई हिने ४थ्या आणि ५६व्या मिनिटाला केले. अस्पायरचा चार सामन्यातील हा तिसरा विजय होता. एका ड्रॉसह त्यांचे आता १० गुण झाले आहेत.
निकाल – तृतिय श्रेणी
सप महाविद्यालय मैदान
गट ब – लिजेंडस एफए (पुढे चाल) वि. दक्ष एफए
गट एच – रेयाल पुणे युनायटेड ब (पुढे चाल) वि. फ्रेंडस इलेव्हन
एसएसपीएमएस मैदान – रेलिगेशन प्ले ऑफ
सनी डेज ३ (सोहेल शेख २रे मिनिट, विनायक अनमोल ५वे मिनिट, चिराग जवराणी ५०वे मिनिट) वि.वि. सुखाई एफसी १ (प्रदीप काळे २८वे मिनिट)
एसएसपीएमएस मैदान – सुपर ८
घोरपडी तमिळ युनायटेड २ (सॅमसन पिल्ले २४वे मिनिट, नेहार पिल्ले ४०वे मिनिट) वि.वि. राहुल एफए १ (आनंद शेंडे ३रे मिनिट)
एफसी बेकडिन्हो ३ (सौरभ पाटिल १७वे, सतिश अजमेरकर २२वे, आकाश महाडिक ५८वे मिनिट) वि.वि. डायनामाईटस १ (अंकित भारसाकळे ५७वे मिनिट)
एसएसपीएमएस मैदान – महिला लिग
गट अ – सिटी गर्ल्स गो स्पोर्टस ० बरोबरी वि. कमांडोज ०
दिएगो ज्युनिअर्स ३ (लेईशा कोठारी २५, ३५वे मिनिट, लेईसा डीकॉस्टा ५५वे मिनिट) वि.वि. सासवड एफसी ०
अस्पायर एफसी २ (सिंग लॅम हुआई ४थे, ५६वे मिनिट) वि.वि. उत्कर्ष क्रीडा मंच ब ०
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तुरुंगवासात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूंची बिघडली तब्येत, रुग्णालयात करण्यात आले भरती
पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावल्याचा आनंद अनावर, श्रीलंकन कर्णधाराचे ‘आक्रमक’ सेलिब्रेशन चर्चेत
रियान परागने हर्षल पटेलसोबतच्या वादाची सांगितली ईनसाईड स्टोरी, बघा काय म्हणाला तो?