---Advertisement---

भारतीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच! गिल-किशनने केला मोठा कारनामा

On: गुरूवार, जून 18, 2026 10:11 AM
---Advertisement---

शुबमन गिल आणि इशान किशन यांच्या धडाकेबाज शतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा १७० धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. भारतीय कर्णधार शुबमन गिलने १५४ धावांची दमदार खेळी केली, तर इशान किशनने १२५ धावा केल्या. या शतकांसह शुबमन गिल आणि इशान किशन यांनी एक मोठा विक्रमही नोंदवला.

एकाच एकदिवसीय सामन्यात ८० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये शतके झळकावणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले. १३ जुलै १९७४ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळल्यापासून भारतीय संघाने १,०७७ सामने खेळले आहेत; मात्र, एकाच सामन्यात दोन भारतीय फलंदाजांनी ८० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये शतके ठोकण्याची कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ होती.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४९.२ षटकांत ४०२ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तानचा संघ ४४.३ षटकांत २३२ धावांत सर्वबाद झाला. भारतासाठी कर्णधार शुबमन गिलने ११० चेंडूंत १५४ धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने २२ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याने अवघ्या ७७ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले.

दुसरीकडे, इशान किशनने ७९ चेंडूंत १२५ धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यामध्ये त्याने १४ चौकार आणि ७ षटकार मारले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना इशानने अवघ्या ७१ चेंडूंत शतक पूर्ण केले. अशा प्रकारे, एकाच सामन्यात ८० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये शतके झळकावणारे इशान किशन आणि शुबमन गिल हे भारतीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिले फलंदाज ठरले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---