आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 चे आयोजन पाकिस्तान करणार आहे. ज्यामध्ये आठ संघ सहभाग नोंदवणार आहेत. भारत 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्राॅफी जेतेपद पटकावले होते. तर यंदाचे खिताब पडकवण्याचे नक्कीच रोहित सेना प्रयत्नशील असतील. या दरम्यान आता एक प्रश्न निर्माण होत आहे, वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा सलामी जोडीदार कोण बनणार? या मुद्यावर दिनेश कार्तिकने आपले मत व्यक्त केला आहे.
क्रिकबझच्या एका कार्यक्रमामध्ये दिनेश कार्तिक नुकताच चहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पहायला मिळाला. यामध्ये एका प्रश्न होता, की चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये शुबमन गिलला मधल्या फळीत फलंदाजी करावी, आणि यशस्वी जयस्वालला कर्णधार रोहित शर्मासोबत सलामी करावी का? या प्रश्नाचे उत्तर दोताना दिनेश म्हणाला, “का? रोहित शर्मा आणि शुबमन गिलचे कॉम्बिनेशन शानदार आहे. हा मी मानतो की, जयस्वाल देखील प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्यासोबत जर शुबमन गिल जर खराब कामगिरी केल्यास बॅकअप म्हणून यशस्वीला नक्की संधी मिळू शकते. तसेच भारताची मधल्या फळीची फलंदाजी युनिट तगडी आहे.”
शुबमन गिल शेवटच्या वेळी भारतासाठी अलिकडेच संपन्न झालेल्या श्रीलंका विरुद्ध खेळताना पहायला मिळाला होता. कारण आगामी चॅम्पियन्स ट्राॅफी वनडे फाॅरमॅटमध्ये खेळवली आहे. यासाठी गिलचा वनडे फाॅर्म पहिला तर श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत त्याने 3 सामन्यात 19 च्या सरासरीने केवळ 57 धावा केल्या. ज्यामध्ये आणखी खराब म्हणजे या मालिकेत त्याचा स्ट्राईक रेट 61.29 होता.
आगामी बांग्लादेश मालिकेआधी शुबमन गिलकडे दुलीप ट्राॅफीमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. परिणामी आपली लय त्याला पुन्हा मिळवायला सोप्पे होईल. दुलीप ट्राॅफीला 5 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. ज्यामधील गिलचे प्रदर्शन बांग्लादेश मालिकेच्या नजराने खूप महत्त्वाचा राहिल.
हेही वाचा-
टी20 पाठोपाठ आता कसोटीतूनही राहुलचा पत्ता कट होणार? सोपं गणित समजून घ्या
दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाली नाही, 400 हून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आता विदेशात क्रिकेट खेळणार
स्टीव्ह स्मिथनं आव्हान स्वीकारलं! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला हरवून इतिहास रचणार; म्हणाला, “यंदा…”