---Advertisement---

‘आमच्या दोघांमध्ये फक्त प्रेम आहे दुसरं काही नाही’, शुबमन गिलचं टीकाकारांना सडेतोड उत्तर!

On: शनिवार, मे 31, 2025 7:48 PM
---Advertisement---

30 मे रोजी हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल 2025 (IPL 2025) एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स (gujrat Titans) 20 धावांनी पराभव केला आणि क्वालिफायर दोन मध्ये त्यांच्या संघाचे स्थान निश्चित केले. या सामन्यात टॉस नंतर हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल यांनी एकमेकांच्या हातात हात मिळवला नाही. यानंतर चर्चांना उधाण आले की, दोघांमध्ये काही ठीक नाही. आता गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे.

गिल आणि हार्दिक पांड्याने टॉस नंतर एकमेकांच्या हातात हात मिळवला नाही. ज्या नंतर जेव्हा गिल बाद झाला, तेव्हा हार्दिक पांड्याने त्याच्या जवळ जाऊन सेलिब्रेशन केले होते. तेव्हा असे वाटत होते की, दोघांमध्ये काही ठीक नाही. तसेच सोशल मीडियावर अफवा उडत होत्या की, त्या दोघांमध्ये भांडण होत आहे. पण 31 मे रोजी गिलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने हार्दिकला मेन्शन करत लिहिले आहे की, आम्हा दोघांच्या मध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही नाही. तुम्ही इंटरनेटच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे गिलने या स्टोरी मधून अफवांवर पूर्णविराम लावला आहे.

एलिमिनेटर सामन्यानंतर गुजरात संघाचा या हंगामातील प्रवास संपला. गुजरातने या सामन्यात चांगल्या प्रदर्शन केलं, पण तरी संघाच्या हाताला निराशात लागली. आयपीएल 2022 ट्रॉफी त्यांच्या नावावर करणाऱ्या गुजरात संघ या हंगामात ट्रॉफी जिंकण्यापासून दूर राहिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---