लॉकडाऊन असल्यामुळे भारतीय संघाचे क्रिकेटपटू आपल्या घरातून सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. सध्या सर्व स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. अशामध्ये खेळाडू एकमेकांशी इंस्टाग्राम व्हिडिओ चॅटमार्फत जुन्या आठवणी शेअर करत आहेत.
भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) टिक-टॉक व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहे. त्याचबरोबर तो लाईव्ह व्हिडिओ चॅटमार्फत आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. चहलने नुकतेच इंस्टाग्रामवर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबरोबर (Mohammed Shami) चर्चा केली.
भारतीय संघात चेष्टा-मस्करी करण्यात सर्वात पुढे कोण असणारा खेळाडू म्हणजे चहल. अशाच प्रकारे शमीदेखील चहलच्या कचाट्यात सापडला आहे. चहलने इंस्टाग्राम चॅॅट सेशनमध्ये शमीला रॅपिड फायर (सलग जास्त वेळ न घेता पटपट प्रश्न विचारणे आणि त्या प्रश्नांची जास्त विचार न करता उत्तर देणे) हा खेळ खेळत अनेक प्रश्नही विचारले.
यादरम्यान चहलने शमीला प्रश्न विचारला की, शेजारी की गर्लफ्रेंड? (Neighbour or Girlfriend) यावर प्रत्युत्तर देत शमी म्हणाला की, “सध्या गर्लफ्रेंडवर काही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे शेजारी.” शमीचे उत्तर ऐकून चहल गमतीने पुढे म्हणाला की, बरोबर आहे. कारण लॉकडाऊनमध्ये शेजारच्यांनाच पाहू शकतो.
इतकेच नव्हे तर, या चर्चेदरम्यान शमीच्या वाढलेल्या दाढीवरही चहलने चेष्टा केली. यावेळी चहल म्हणाला की, तुझ्या दाढी कापण्यासाठी गवत कापण्याची मशीन वापरावी लागेल. कारण ट्रीमर १५ वेळा चार्ज करावा लागेल.” यावर शमी म्हणाला की, तू सुद्धा माझ्याप्रमाणे दाढी वाढवून घे किंवा त्याला खतपाणी घाल. जेणेकरून दाढी येईल.
या चॅटदरम्यान दोघांनी, आपल्या परिवाराबरोबर वेळ कसा घालवतात हेदेखील सांगितले. यावेळी शमी म्हणाला की, तो आपल्या परिवाराबरोबर वेळ घालवतो. संध्याकाळी तो फीटनेसवर काम करतो. पबजी खेळण्याबरोबरच टिक-टॉक व्हिडिओही बनवतो. तसेच शमी पुढे म्हणाला की, तो स्केच बनवण्याची ट्रेनिंगही घेत आहे.
त्याचबरोबर चहल आपल्याबद्दल बोलताना म्हणाला की, “मी ऑनलाईन भांगडा डान्स शिकत आहेत. फीटनेसबद्दल सांगायचे झाले तर, दिलेले वेळापत्रक मी फॉलो करत आहे. मला क्रिकेटची खूप आठवण येत आहे. आता असा विचार करत आहे की, एखादा मोठा दौरा येईल आणि २-३ महिन्यांसाठी बाहेर जाईल.”
सध्या कोविड-१९ मुळे भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्याचबरोबर आयपीएलही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-सुरेश रैनाने केलेत गंभीर आरोप, टीम इंडियाशी संबंधित या लोकांवर साधला निशाना
-काय सांगता! कसोटीमध्ये चौथ्या डावात या ५ खेळाडूंनी केली आहे द्विशतके
-कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज