---Advertisement---

ड्रमला लक्ष्य करून शिकला गोलंदाजी; कारकिर्दीत ९४९ विकेट्स घेणाऱ्या ‘या’ खेळाडूने सचिनलाही फोडला घाम

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 9:30 AM
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमध्ये असे खूप कमी गोलंदाज आहेत जे वर्षानुवर्षे सातत्याने चांगली कामगिरी करून संघात स्थान टिकवून ठेवतात. त्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने हे साध्य करून दाखवलं. आजही जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये त्याची गणना होते.

तरुण असताना खेळपट्टीवर फेकू शकत नव्हता चेंडू
न्यू साऊथ वेल्समधील नॅरोमाईन या छोट्या गावात जन्मलेल्या ग्लेन मॅकग्राला स्पर्धेच्या एका सामन्यात कर्णधाराने गोलंदाजी दिली नव्हती. कारण तो खेळपट्टीवर चेंडू फेकू शकत नव्हता. मॅकग्रा चेंडूला खेळपट्टीच्या बाहेर फेकत होता. म्हणजे त्याची लाईन-लेंग्थ खूपच खराब होती.

गोलंदाजीवर घेतले कठोर परिश्रम
त्यानंतर मॅकग्राने त्याच्या गोलंदाजीवर कठोर परिश्रम घेतले. त्याने आपल्या घरामागील छोट्या बागेत गोलंदाजीचा सराव सुरू केला. त्यावेळी मॅकग्राकडे सराव करण्यासाठी खेळपट्टी नव्हती. परंतु त्याने बागेत पडून असलेल्या लोखंडी ड्रमला लक्ष्य करुन गोलंदाजीला सुरुवात केली. सरावामुळे मॅकग्राच्या लाईन-लेंग्थमध्ये सुधार झाला. त्यानंतर त्याने अनेक विक्रम मोडले.

कठोर संघर्ष करून केले पदार्पण
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात ग्लेन मॅकग्राने खूप संघर्ष केला. तो क्रिकेट खेळण्यासाठी सिडनीला आला होता. तिथे तो ग्रेड क्रिकेट खेळण्यासह एका बँकेत काम करायचा. मॅकग्राकडे राहण्यासाठी घर नव्हते आणि तो व्हॅनमध्ये रात्र घालवायचा. तथापि, मॅकग्राची वेळ लवकरच बदलली आणि त्याने 12 नोव्हेंबर 1993 रोजी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले.

कर्टनी वॉल्शचा मोडला विक्रम
मॅकग्राने आपल्या कारकिर्दीत अनेक टप्पे गाठले. परंतु त्याची सर्वात मोठी कामगिरी कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणारा वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्शचा विक्रम मोडणे आहे. मॅक्ग्राने वॉल्शला मागे टाकत कसोटीत 563 बळी घेतले. आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसनने मॅकग्राला मागे टाकले आहे. मॅकग्राने आपल्या गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांना चांगलचं त्रस्त केलं होतं. यामध्ये 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरचाही समावेश होता.

वनडे सामन्यात घेतले 381 बळी
मॅकग्रा याने 250 वनडे सामन्यात 22.02 च्या सरासरीने 381 बळी घेतले आहेत. 15 धावात 7 बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. याव्यतिरिक्त टी20 क्रिकेटमध्ये मॅकग्राने 5 बळी घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तो’ मॅच विनिंग झेल सोडणाऱ्या हसन अलीचेही भर मैदानात पाणावले डोळे, पाहा तो भावनिक क्षण

न्यूझीलंड संघाला मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू टी२० विश्वचषक फायनलसहित भारत दौऱ्यातूनही बाहेर

टी२० विश्वचषक: तीन वेळा सेमीफायनलमध्ये हारणारा पाकिस्तान एकमेव संघ, पाहा यापूर्वी केधी केलीय ‘ही’ नकोशी कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---