मंगळवारी (२६ एप्रिल) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना झाला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या केली नव्हती, पण तरीही आरसीबीच्या फलंदाजांना लक्ष्य गाठता आले नाही. ऑस्ट्रेलियन दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल बॅटसह या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. शून्यावर बाद झाल्यानंतर मॅक्सवेलने स्वतःच्या नावावर आयपीएलचा एक नकोसा विक्रम नोंदवला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना १४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीच्या फलंदाजांनी खूपच निराशाजनक प्रदर्शन केले. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटीदारनंतर चौथ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) फलंदाजीसाठी आला आणि गोल्डन डकवर म्हणजेच पहिलाच चेंडू खेळताना बाद झाला. कर्णधार डू प्लेसिस आणि अष्टपैलू मॅक्सवेल, हे दोघेही कुलदीप सेनने टाकलेल्या डावातील ७ व्या षटकात तंबूत परतले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या निराशाजनक प्रदर्शनानंतर मॅक्सवेल असा विदेशी खेळाडू बनला आहे, जो आयपीएच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे. ही १२ वी वेळ आहे, जेव्हा त्याने एकही धाव न करता विकेट गमावली आहे. यापूर्वी अफगाणिस्तानचा माजी कर्णधार राशिद खान आणि मॅक्सवेलने प्रत्येकी ११ वेळा ही नकोशी कामगिरी केली होती, पण आता मॅक्सवेलने राशिदलाही मागे सोडले आहे. राशिद आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर सुनील नारायण आहे, जो आयपीएलमध्ये १० वेळा शून्यावर बाद झाला आहे. दक्षिण अफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिविलियर्स देखील आयपीएमध्ये १० वेळी खाते न खोलता बाद झाला आहे
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे विदेशी खेळाडू
१२ – ग्लेन मॅक्सवेल
११ – राशिद खान
१० – सुनील नरेन
१० – एबी डिविलियर्स
उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ४ विकेट्सच्या नुकसानावर १४४ धावा केल्या आणि आरसीबीपुढे विजायासाठी १४५ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आरसीबीने ११५ धावांवर सर्व विकेट्स मागवल्या आणि २९ धावांनी पराभव स्वीकारला.
राजस्थानसाठी कुलदीप सेनने चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून दिला. सेनने टाकलेल्या ३.३ षटकात २० धावा खर्च केल्या आणि चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजीच रियान पराग एकमेव फलंदाज ठरला ज्याने राजस्थानसाठी अर्धशतकी खेळी केली. रियानने केलेल्या नाबाद ५६ धावांसाठी त्याला सामनावीर निवडले गेले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘…तेव्हा आम्हाला रोखणे कठीण होईल’, कोलकाताच्या कर्णधाराचे मोठे वक्तव्य
RCB vs RR सामन्यात राजस्थानच ‘रॉयल’, बेंगलोरला २९ धावांनी नमवत गुणतालिकेत घेतली उत्तुंग भरारी






