‘…तेव्हा आम्हाला रोखणे कठीण होईल’, कोलकाताच्या कर्णधाराचे मोठे वक्तव्य

'...तेव्हा आम्हाला रोखणे कठीण होईल', कोलकाताच्या कर्णधाराचे मोठे वक्तव्य

कोलकाता नाईट रायडर्सने जेव्हा हंगामातील त्यांचे सुरुवातीचे तीन सामने जिंकले होते, तेव्हा तो एक असा संघ दिसत होता, हंगामात चांगले प्रदर्शन करू शकतो. परंतु त्यानंतर संघाची कामगिरी कोलमडल्याची दिसत आहे. केकेआरने त्यांचे मागचे सलग चार सामने गमावले आहेत. असे असले, तरी कर्णधार श्रेयस अय्यरला संघ नक्कीच पुनरागमन करेल असा विश्वास आहे. अय्यरच्या मते केकेआर एकदा विजयीपथावर परतल्यानंतर त्याला रोखणे कठीण असणार आहे.

दोन वेळा आयपीएल ट्रॉफि जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२२मधील (IPL 2022) सुरुवातीच्या आठ सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर राहिलेल्या पाच सामन्यात त्यांना पराभव मिळाला आहे. सुरुवातीच्या चार सामन्यांपैकी तीन सामने केकेआरने जिंकले, पण मागच्या सलग चार सामन्यात त्यांना पराभव मिळाला आहे. असे असले, तरीही कर्णधार श्रेयस अय्यरला संघावर पूर्ण विश्वास आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) म्हणाला की, “आम्ही मैदानात उतरल्यानंतर सामना जिंकण्यासाठी सर्व विभागांमध्ये चांगल्या प्रदर्शनाचा प्रयत्न करत आहोत. हे फक्त चांगले प्रदर्शन करण्याविषयी आहे. त्याव्यतिरिक्त मला या गोष्टीचा खरंच अभिमान आहे की, मी एका अद्भुत फ्रँचायझीचा भाग आहे. हे माझ्यासाठी एका अशा संघाचे नेतृत्व करणे आहे, जिथे आम्ही खूप साऱ्या प्रतिभेला खेळताना पाहत आहोत. आम्ही पहिल्या चार सामन्यांत तीन विजयासह खरंच चांगली सरुवात केली होती, पण पुढे गोष्टी नीट घडल्या नाहीत. मला अजूनही संघावर विश्वास आहे.”

आयपीएलचे क्वालिफायर सामने कोलकातास्थित ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहेत. याविषयी बोलताना श्रेयस म्हणाला की, “आम्हाला आत्ताच समजले की, क्वालिफायर ईडन गार्डनमध्ये होणार आहेत. त्यामुळे आम्ही पुढचा प्रत्येक सामना जिंकण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करू आणि त्याठिकाणी जाऊन आमच्या चाहत्यांचे मनोरंजन करू.”

दरम्यान, केकेआरला त्यांचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना २८ एप्रिल रोजी वानखडे स्टेडियमवर खेळला जाईल.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या

RCB vs RR सामन्यात राजस्थानच ‘रॉयल’, बेंगलोरला २९ धावांनी नमवत गुणतालिकेत घेतली उत्तुंग भरारी

संघाला गरज असताना सॅमसन स्वस्तात बाद, मग नेटकऱ्यांनीही केली थेट पाकिस्तानी खेळाडूशी तुलना

होणाऱ्या सासऱ्यांचा ‘तो’ सल्ला घेत आफ्रिदीने भारताच्या स्टार फलंदाजांना धाडलेलं तंबूत; ६ महिन्यांनी खुलासा

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.