Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

होणाऱ्या सासऱ्यांचा ‘तो’ सल्ला घेत आफ्रिदीने भारताच्या स्टार फलंदाजांना धाडलेलं तंबूत; ६ महिन्यांनी खुलासा

होणाऱ्या सासऱ्यांचा 'तो' सल्ला घेत आफ्रिदीने भारताच्या स्टार फलंदाजांना धाडलेलं तंबूत; ६ महिन्यांनी खुलासा

April 26, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Shaheen-Afridi-Pakistan

Photo Courtesy: Twitter/ICC


पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी त्यांच्या संघासाठी महत्वाचा खेळाडू बनला आहे. शाहीनने पाकिस्तानला अनेक महत्वाचे सामने जिंकवून दिले आहेत. मागच्या वर्षी यूएईमध्ये खेळल्या गेगेल्या आयसीसी टी२० विश्वचषकात देखील त्याने संघासाठी अप्रतिम गोलंदाजी केली होती. विश्वचषकात भारतीय संघाचा पहिल्यांदा पराभव करण्यासाठी देखील त्याचे योगदान सर्वात महत्वाचे होते.

मागच्या वर्षीचा आयसीसी टी२० विश्वचषकाचे यजमानपद बीसीसीआयने भूषवले होते. परंतु भारतात त्यावेळी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असल्यामुळे स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केली गेली होती. पाकिस्तानने यूएईतील परिस्थितीचा चांगलाच फायदा उचलला आणि स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले. विश्वचषकाच्या इतिहासात भारताला पहिल्यांदा पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. आता या सामन्याविषयी शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने एक खुलासा केला आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

टी२० विश्वचषकाच्या जवळपास सहा महिन्यांनंतर शाहीनने हा खुलासा केला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात उतरण्यापूर्वी शाहीनने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याच्याकडून खास सल्ला घेतला होता. शाहीनच्या मते या सल्ल्यामुळेच तो सामन्यात चांगले प्रदर्शन करू शकला आणि भारताला पराभूत केले.

“जेव्हा आमचा सामना भारतासोबत होता, तेव्हा मी लाला (शाहिद आफ्रिदी) यांच्याकडे सल्ला मागितला होता, कारण यापूर्वी मी फक्त एकदा आशिया कपमध्ये भारताविरुद्ध खेळलो होतो. ते देखील एकदिवसीय प्रकारात आणि हा टी२० सामना होता. आम्ही भारताविरुद्ध विश्वचषकात कधीच विजय मिळवला नव्हता. मला वाटले होते की, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे, त्यामुळे लालाकडे काही सल्ला मागितला की, मी वेगळे काय करू शकतो. त्यांनी मला खूप चांगला सल्ला दिला आणि म्हणाले की, असे काहीतरी कर, ज्यामुळे पूर्ण स्टेडियम तुझ्याकडे आकर्षित होईल. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात स्वतःचे १०० टक्के दे. मी देखील फक्त हेच केले आणि चांगले परिणाम मिळाले,” असे शाहीन आफ्रिदीने सांगितले.

दरम्यान, भारताविरुद्धच्या या सामन्यात शाहीनने विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या तीन महत्वाच्या विकेट्स नावावर केल्या होत्या. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात १५१ केल्या होत्या. पाकिस्तानने हे लक्ष्य एकही विकेट न गमावता गाठले आणि विश्वचषकाच्या इतिहासातील भारताविरुद्धचा पहिला विजय मिळवला. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान (७९)आणि बाबर आजम (६८) या सलामीवीर जोडीने अप्रतिम प्रदर्शन केले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आता धीराने नाही, तर जोमाणे करावे लागेल काम; चेन्नईच्या फलंदाजांकडून चाहत्यांना आक्रमक खेळीची अपेक्षा

हार पत्करायला तयार नाही गुजरात टायटन्स; शमीने उचलला सर्वाधिक विकेट घेण्याचा विडा

“पोलार्डपेक्षा उनाडकट जास्त चेंडू हिट करतोय”, माजी भारतीय क्रिकेटपटूने साधला निशाणा


ADVERTISEMENT
Next Post
Kagiso-Rabada

'धोनीविरुद्ध गोलंदाजी करताना सगळ्यांचीच टरकते', चेन्नईविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पंजाबच्या गोलंदाजाचे वक्तव्य

Virat-Kohli

RCB vs RR। विराट कोहलीविषयी मोठी अपडेट, आरसीबीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचा बदल

Sanju-Samson

खेळी छोटीच, पण रेकॉर्ड मोठा! रोहित-विराट अन् रैनाच्या तिकडीला मागे टाकत सॅमसनचा खास कारनामा

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.