ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या टी20 विश्वचषकात शुक्रवारी (4 नोव्हेंबर) दिवसातील दुसरा सामना यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. ऑस्ट्रेलियाला आपल्या उपांत्य फेरीचा आशा कायम राखण्यासाठी या सामन्यात विजयाची गरज होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात शेवटी ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी निसटता विजय मिळवला. या विजयामुळे त्यांची उपांत्य फेरीत जाण्याची संधी अजूनही कायम आहे. मात्र, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने निर्णयाक क्षणी केलेल्या धावबादमूळे अचानक सामन्याला कलाटणी मिळाली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाला 42 चेंडूंवर 70 धावांची गरज होती. इब्राहिम झादरान व गुलबदीन नईब या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केलेली. त्या क्षणी अफगाणिस्तानचे सामन्यात पारडे जड होते. मात्र, त्याच षटकात अफगाणिस्तानचे तीन प्रमुख फलंदाज बाद झाले.
https://www.instagram.com/reel/CkiXWsqsBB7/?igshid=YmMyMTA2M2Y=
ऍडम झंपा टाकत असलेल्या षटकातील पहिला चेंडू झादरानने लॉंग ऑनच्या दिशेने मारला. तेव्हा 30 यार्डाच्या आत कोणताही क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करत नव्हता. तेव्हा ग्लेन मॅक्सवेल याने मोठे अंतर पार करत तब्बल 46 मीटरवरून थेट फेक करत नॉन स्ट्राइकवरील यष्ट्यांचा वेध घेतला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेला नईब या थेटफेकीमुळे धावबाद झाला.
या धावबादनंतर सामन्याचा नूर पालटला. पुढच्या चेंडूवर झादरान तर त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर नजीब झादरान बाद होत परतले. मात्र, मॅक्सवेलची ही फेक सामना बदलणारी ठरली. मॅक्सवेलने या सामन्यात फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले होते. स्पर्धेत आतापर्यंत अपयशी ठरत असताना त्याने या सामन्यात 32 चेंडूवर 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा केल्या. तसेच एक झेलही टिपला. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग: विश्वचषकातून बाहेर पडताच गंभीर आरोप लावत नबीने सोडले अफगाणिस्तानचे कर्णधारपद
शार्दुलने धोनीबद्दल केला मोठा खुलासा; जे काही म्हणाला, त्याने ‘माही’वरील तुमचंही प्रेम आणखी वाढेल