ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यानची टी20 मालिका नुकतीच समाप्त झाली. मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने इंग्लंडने मालिकेवर 2-0 असा कब्जा केला. यजमान ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषकापूर्वी हा मोठा धक्का मानला जातोय. परंतु, त्यापेक्षाही संघाचा अनुभवी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचा खराब फॉर्म चिंचेचा विषय बनला आहे.
आपल्या तुफानी फलंदाजांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 3 शतके आणि 9 अर्धशतके ठोकलीत. परंतु, फेब्रुवारीपासून आतापर्यंत त्याला फक्त एकदाच मोठ्या धावा करता आल्या आहेत. यापेक्षाही आश्चर्याची बाब म्हणजे म्हणजे मॅक्सवेल गेल्या 20 महिन्यांत 16 वेळा दुहेरी आकडा पार करू शकलेला नाही. शेवटच्या 7 सामन्यातही त्याला फक्त 24 धावा आल्या आहेत. यादरम्यान तो मायदेशात तसेच परदेशातही अपयशी ठरला.
त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने या वर्षात 15 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 11 सामन्यात त्याने गोलंदाजी केली. त्यातील दोनच सामन्यात मिळून तो 3 बळी घेऊ शकला आहे. अशा परिस्थितीत मॅक्सवेलचा फॉर्म ऑस्ट्रेलियन संघासाठी चिंतेचा विषय आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यातही तो 8 धावा करू शकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन त्याच्यावर आणखी भरवसा दाखवणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मॅक्सवेल याचा खराब फॉर्म इतर खेळाडूंसाठी फायदेशीर ठरू शकतो. नुकतेच ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलेल्या टीम डेव्हिडने चांगली कामगिरी करून दाखवलीये. तसेच, मिचेल मार्श व मार्कस स्टॉयनिस हे दोन्ही अष्टपैलू संघातील आपली जागा देखील निश्चित करण्याचा प्रयत्न करतील. सराव सामन्यांमध्ये मॅक्सवेल अपयशी ठरल्यास युवा कॅमेरून ग्रीन याचा संघात समावेश करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलिया घेऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत दाखवून दिला आपला दम, ‘कॅप्टन’ बटलर मालिकावीर
पुजाराचा स्ट्राईक रेट पाहून तुम्ही म्हणाल, “अरे हा तर टी20 स्पेशालिस्ट”; खेळलीये धमाकेदार खेळी