---Advertisement---

टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये रोहितची बादशाहत संपली! ग्लेन मॅक्सवेलच्या शतकामुळे भारतीय कर्णधाराची डोकेदुखी वाढली

On: मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023 11:39 PM
Glenn Maxwell Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना मंगळवारी (28 नोव्हेंबर) गुवाहाटीमध्ये खेळला गेला. बरसापारा स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतासाठी ऋतुराज गायकवाड याने शतक केले. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियासाठी ग्लेन मॅक्सवेल याने शतक ठोकले. मॅक्सवेल या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी मॅच विनर ठरला.

टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अखेर विजय मिळाला. भारतीय संघाला 5 विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाने पराभूत केले. भारतीय संघ या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आला. 20 षटकांमध्ये 3 विकेट्सच्या नुकसानावर 222 धावांपर्यंत भारताने मजल मारली. प्रत्युत्तारत ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्सच्या नुकसानावर 225 धावा केल्या आणि शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने 48 चेंडूत 104 धावांची खेळी केली.

या शतकी खेळीनंतर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय दिग्गज रोहित शर्मा याची बरोबरी केली. मॅक्सवेल याच्या टी-20 कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर होता. रोहितच्या नावावर आतापर्यंत 4 टी-20 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. मंगळवारी (28 नोव्हेंबर) मॅक्सवेलने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील चौथे शतक केले आणि रोहितच्या विक्रमाची बरोबरी केली.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
4: ग्लेन मॅक्सवेल*
4: रोहित शर्मा
3: सूर्यकुमार यादव
3: कॉलिन मुनरो
3: बाबर आझम

उभय संघांतील या सामन्यात पहिल्या डावात ऋतुराज गायकवाडची खेळी कौतुकास्वत ठरली. ऋतुराजने अवघ्या 57 चेंडूत 123 धावांची कुटल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 215.78 एवढा होता. यात 13 चौकार आणि 7 षटकार मारले. (Glenn Maxwell has equaled Rohit Sharma’s most T20I centuries)

महत्वाच्या बातम्या – 
ऋतुराजसाठी लकी ठरतोय 28 नोव्हेंबर! सलग दुसऱ्या वर्षी मैदानावर घातला धुमाकूळ
गुवाहाटीत ऋतुचे ‘राज’! ऑसी गोलंदाजी झोडत टी20 शतकासह बनवले रेकॉर्डच रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---