इंडियन प्रीमियर लीग 2023च्या 60व्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल याने आणखी एक अर्धशतक झळकावले. त्याच्या या जबरदस्त फॉर्मवर चाहते देखील अत्यंत खुश आहेत. दरम्यान, या हंगामातील त्याचे हे पाचवे अर्धशतक आहे. स्टार फलंदाज विराट कोहली आज काही खास करामत दाखवू शकला नाही. विराट केवळ 18 धावा करून बाद झाला. मात्र, आरसीबीचा आक्रमक फलंदाज मॅक्सवेलने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत 54 धावांची विस्फोटक खेळी खेळली. यादरम्यान त्याने मारलेल्या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हंगामातील या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या सलामीच्या जोडीची सुरुवात संथ झाली. सातव्या षटकात ते बाद झाले. पहिली 7 षटके पाहिल्यावर असे वाटत होते की, ही खेळपट्टी संथ होती आणि फलंदाजांना धावा काढणे सोपे जाणार नाही, पण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेलने हे सर्व चुकीचे सिद्ध करत नवीन समीकरण खेळपट्टीवर आणले.
मॅक्सवेलचा जलवा कायम
कोहलीच्या विकेटनंतर मॅक्सवेलने येताच धावा काढण्यास सुरुवात केली. राजस्थानच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्यात त्याला यश मिळाले. ज्या षटकात मॅक्सवेल फलंदाजीला आला होता, ते षटक आर अश्विन टाकत होता. या षटकातील पहिल्या पाच चेंडूत पाच एकेरी धावा आल्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेलने असा षटकार मारला की, सगळे चेंडूकडे पाहतच राहिले. अश्विनने हा बॉल नेमका मॅक्सवेलच्या रडारवर दिला आणि मॅक्सवेलने स्टँडिंग लाँग ऑनवरही षटकार ठोकायला मागे पुढे पाहिले नाही. मॅक्सवेलचा हा षटकार 98 मीटर अंतरावर जाऊन पडला. त्याचा हा षटकार पाहून अश्विनच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसून येत होती.
मॅक्सवेलचा षटकार पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दुसरीकडे, या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पहिली विकेट लवकर गमावल्यानंतर, डू प्लेसिस आणि मॅक्सवेल यांनी पुन्हा एकदा डाव सांभाळला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची शानदार भागीदारी झाली. या भागीदारीमुळे आरसीबीच्या डावाला गती मिळाली. यादरम्यान फाफने 55 धावा चोपत चालू हंगामातील सातवे अर्धशतकही झळकावले. सामन्याअखेर बेंगलोरने दिलेले 172 धावांचे आव्हान पार करण्यात राजस्थान संघ अपयशी ठरला. त्यांना यावेळी 10.3 षटकात फक्त 59 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना बेंगलोरने 112 धावांच्या फरकाने खिशात घातला. तसेच, गुणतालिकेत पाचवे स्थान काबीज केले. (glenn maxwell hit a longest 98 meter six to complete his half century)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
ब्रेकिंग! राजस्थानच्या बालेकिल्ल्यात बेंगलोरचा 112 धावांनी दणदणीत विजय, ‘रॉयल्स’चे आव्हान संपुष्टात
याला म्हणतात कंसिस्टन्सी! IPL 2023मध्ये ‘अशी’ कामगिरी फक्त फाफलाच जमली, लगेच वाचा