इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड (The Hundred)लीग स्पर्धेची चांगलीच चर्चा सुरू आहे. दुसऱ्या हंगामाच्या या लीगमध्ये दिवसेंदिवस सामने जसजसे पुढे जात आहेत तसतसे नवे विक्रम पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेत अनेक देशाचे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत खेळल्या जाणाऱ्या दहाव्या सामन्यात लंडन स्पिरीट संघाने साउथर्न ब्रेव संघाला ९ धावांनी पराभूत केले. लंडनचा हा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय ठरला आहे. लंडनच्या संघात आयपीएल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघाच्या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे.
लंडन स्पिरीटकडून खेळणाऱ्या कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने २० चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने २१ चेंडूत ३४ धावा करत एक विकेटही घेतली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पोलार्ड मुंबई आणि मॅक्सवेल बेंगलोरकडून खेळले आहेत.
या सामन्यात लंडनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी १०० चेंडूत ६ विकेट्स गमावत १४७ धावा केल्या. मॅक्सवेल (३४) बरोबरच डॅनियल बेल याने ३३ चेंडूत ४६ धावा केल्या. यामध्ये त्याने ५ चौकार आणि एक षटकार मारला. सामन्यातील काही चेंडू शिल्लक असताना पोलार्डने काही फटके मारले. यामुळे संघाची धावसंख्या १४७ झाली.
साउथर्नने लक्ष्याचा पाठलाग करताना ७ विकेट्स गमावल्या. जेम्स विन्स याला पहिल्याच चेडूंत मॅक्सवेलने त्रिफळाचीत करत त्यांना सुरूवातीलाच धक्का दिला. यावेळी ऍलेक्स डेविसने ३० चेंडूत ३६ धावा केल्या. तर रॉस व्हिटली याने अर्धशतकी खेळी केली. त्याने ३३ चेंडूत ५२ धावा केल्या. मात्र लंडनच्या गोलंदाजी आक्रमानासमोर त्यांची खेळी अपूरी पडली. हा सामना लंडन स्पिरीटने ९ धावांनी जिंकला.
लंडन स्पिरीटने सामना जिंकल्याने ते गुणतालिकेत ३ सामन्यातील ३ विजयासह सहा गुण मिळवत पहिल्या स्थानावर आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्या हातात असते तर…’, धवनला नेतृत्त्वावरून हटवण्याच्या निर्णयाबद्दल माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया
आंद्रे रसेल थेट विंडीजच्या प्रशिक्षकांवरच भडकला! वाचा काय आहे प्रकरण
अखेर अफगाणिस्तानच्या हाती यश, आयर्लंडविरुद्ध सलग २ टी२० पराभवांनंतर उघडले खाते