---Advertisement---

“त्याने माझ्या कठीण परिस्थितीला समजून घेतले होते”, ग्लेन मॅक्सवेलने केली ‘या’ खेळाडूची स्तुती

On: मंगळवार, मार्च 2, 2021 9:30 PM
---Advertisement---

जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट लीग मानली जाणारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. गतवर्षी ही स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात आली होती. मात्र आता आगामी १४वा हंगाम भारतातच खेळवले जाईल, अशी चिन्हं दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसातच सर्वच संघाचे सराव शिबिर सुरू होणार आहे. आयपीएल २०२०च्या लिलावात आरसीबी संघाने १४.२५ कोटी खर्च करत संघात सहभागी केलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने विराट कोहली सोबत खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हंटले आहे. यासोबतच त्याने कोहलीवर स्तुतीसुमने देखील उधळली आहेत.

गतवर्षी पंजाब संघाकडून खेळलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा यंदा रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाकडून लांब लांब षटकार मारताना दिसणार आहे. बंगलोर संघाने त्याला १४.२५ कोटी खर्च करत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. सराव शिबिर सुरू होण्यापूर्वी त्याने विराट कोहली सोबत खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हंटले आहे.

विराट कोहलीवर उधळली स्तुतीसुमने

मॅक्सवेलने विराट कोहलीवर स्तुतीसुमने उधळत म्हंटले आहे की, “गेल्या काही काळापासून विराट खेळाच्या प्रत्येक प्रकारात आपली छाप सोडत आहे. आणि या खेळात खूप उंच शिखरावर आहे. तो परिस्थितीनुसार आपल्या खेळात बदल करत असतो. आणि यामुळेच त्याचा बोलबाला हा कित्येक वर्षांपासून आहे. हेच कारण आहे की भारतीय कर्णधार इतक्या वर्षांपासून सर्वश्रेष्ठ आहे. तो आपल्या संघावर दबाव येऊच देत नाही.”

विराटकडून शिकण्यासाठी उत्सुक

आयपीएल मध्ये ग्लेन मॅक्सवेल विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. याबद्दल तो म्हणाला, “मी आयपीएलमध्ये विराट कोहली सोबत फक्त सामना खेळण्यासाठीच नव्हे, तर सराव करण्यासाठी देखील तितकाच उत्साही आहे. मला त्याची प्रक्रिया समजून घ्यायची आहे. मला आशा आहे की मला त्याच्याकडून संघाच्या नेतृत्वाबाबत काही गोष्टी शिकायला मिळतील. मी जेव्हा मानसिक विश्रांती घेतली होती तेव्हा त्याने माझे समर्थन केले होते. एकाप्रकारे त्याने मला समजून घेतलं होत की मी कुठल्या परिस्थितीतून जात आहे.”

महत्वाच्या बातम्या:

हरभजनचे रुपेरी पडद्यावरील पदार्पण पाहून पत्नी गीता बासराने दिली मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाली आजकाल प्रत्येकाला हिरो

स्लिप मधील क्षेत्ररक्षकाने हवेत सूर मारत घेतला अविश्वसनीय झेल, एकदा व्हिडिओ पाहाच

आयपीएलमध्ये कसा असेल चेन्नईचा संघ? ही आहे संभावित प्लेयिंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---