---Advertisement---

आयपीएलमध्ये कसा असेल चेन्नईचा संघ? ‘ही’ आहे संभावित प्लेयिंग इलेव्हन

On: मंगळवार, मार्च 2, 2021 8:15 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा थरार येत्या एप्रिल महिन्यात रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात सर्व संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचे सराव शिबिर येत्या ११ मार्च पासून सुरु होणार आहे. मागच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नई संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. अशातच संघातील मुख्य खेळाडूचे देखील पुनरागमन झाले आहे. त्यामुळे चेन्नई संघ अजूनच मजबूत झाला आहे. अशातच कोणत्या खेळाडूंना प्लेयिंग इलेव्हन मध्ये संधी मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स नंतर चेन्नई सुपर किंग्स दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. चेन्नईने ४ वेळा जेतेपद पटकावले आहे. तसेच १४ व्या हंगामात पहिल्यांदाच चेन्नई संघाला प्लेऑफ गाठण्यास अपयश आले होते. अशातच मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना देखील संघात परतला आहे. गतवर्षी मध्यक्रमात सुरेश रैनाची कमतरता दिसून आली होती. यावेळी चेन्नईने मध्यक्रमासाठी चेतेश्वर पुजाराला देखील संघात समाविष्ट केले आहे. पुजाराला चेन्नई संघाने २० लाखाच्या मूळ किंमतीत खरेदी केले आहे. परंतु चेन्नई संघ सुरेश रैनालाच खेळवणार असे दिसून येत आहे.

गतवर्षी सतत पराभव होत असताना एमएस धोनीने म्हंटले होते की युवा संघातील युवा खेळाडूंमध्ये ते कौशल्य दिसून येत नाहीये की त्यांना संघात संधी द्यावी. त्यांनतर चेन्नई सुपर किंग्स संघाकडून शेवटच्या ३ सामन्यात सलामीला जाण्याची संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाडने तीनही सामन्यात अर्धशतक झळकवत आपली दावेदारी सिद्ध केली होती. सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत देखील तो महाराष्ट्र संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्स संघाला देखील त्याच्याकडून चांगली सुरुवात करून देण्याची अपेक्षा असणार आहे.

असा असू शकतो चेन्नईचा संघ –

फाफ डू पलेसिस, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, एमएस धोनी, सॅम करन, रवींद्र जडेजा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, लुंगी एन्गिडी, दीपक चहर.

महत्वाच्या बातम्या:

आयसीसी वनडे क्रमवारी : स्मृती मंधानाची घसरण, तर झुलन गोस्वामी-मिताली राज अव्वल दहामध्ये कायम

बजरंग पुनिया घेतोय सोशल मीडियापासून ब्रेक, हे आहे कारण

चौथ्या कसोटी सामन्यात रोहित-शुबमनलाच मिळणार का सलामीला संधी? हे आहेत भारतीय संघासमोरील पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---