यावर्षी टोकियो, जपान येथे ऑलिंपिक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील खेळाडू तयारीला लागले आहेत. यात भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने तर ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्व सोशल मीडियापासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुनियाने ऑलिंपिक संपेपर्यंत तो सोशल मीडिया पासून दूर राहाणार असल्याचे ट्विट करुन सांगितले आहे. त्याने ट्विट केले आहे की ‘मी माझे सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स आजपासून बंद करत आहे. आता ऑलिंपिक नंतरच आपली भेट होईल. आशा आहे की तुमचे प्रेम कायम राहिल. जय हिंद’
Mein apne sabhi social media handles ko aaj se band kar raha hu. Ab Olympic ke baad aap sabhi se mulaakaat hogi … ummeed karta hu aap apna pyaar banaye rakhenge ….. jai Hind ???????? pic.twitter.com/wCKXuT4gj9
— Bajrang Punia ???????? (@BajrangPunia) March 1, 2021
टोकियोमध्ये यावर्षी २३ जुलै २०२१ ते ८ ऑगस्ट २०२१ दरम्यान ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. खरंतर ही स्पर्धा मागीलवर्षीच होणार होती. मात्र मागीलवर्षी कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली.
पुनियाने २०१९ साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोटा मिळवत ऑलिंपिकसाठी जागा पक्की केली होती. तो नुकताच अमेरिकेतून १ महिन्याच्या कॅम्पमध्ये सहभागी होऊन मायदेशी परतला आहे. तसेच त्याला आता गुरुवारपासून इटलीमध्ये होणाऱ्या विश्वकुस्तीच्या रँकिंग सिरीज स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. पुनिया ६५ किलो वजनी गटात कुस्ती खेळतो.
पुनियाबद्दल थोडक्यात
भारताच्या सध्याच्या अव्वल कुस्तीपटूंपैकी एक असलेल्या पुनियाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत २०१८ साली रौप्यपदक, २०१३ आणि २०१९ साली कांस्यपदक मिळवले आहेत. तर एशियन गेम्समध्ये त्याने २०१८ साली सुवर्णपदक आणि २०१४ सालामध्ये रौप्यपदक जिंकले आहे. तसेच २०१८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले आहेत. तर २०१४ मध्ये त्याने रौप्यपदक जिंकले आहे. तसेच त्याला आत्तापर्यंत अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या हाताला लकवा मारला होता, त्याच हाताने सोनमने केला ऑलम्पिक मेडल विजेती साक्षीचा पराभव
संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी
सात नाही तर आठ फेरे घेत संगीता फोगट, बजरंग पुनिया अडकले विवाहबंधनात, पाहा फोटो