---Advertisement---

‘आमच्याकडे कितीही पैसे असले तरी आम्ही सूर्यकुमार यादवला बीबीएलमध्ये…’, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलूचे विधान

Suryakumar-Yadav-POTM
---Advertisement---

भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने मागील वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुरू झालेला त्याचा धमाका आजही सुरू आहे. तो केवळ धावा करण्याचत अग्रेसर नसून विविध प्रकारचे शॉट्सही तो खेळतो. यामुळे त्याच्या फलंदाजीचे चाहते सामन्यात जनतेबरोबर खेळाडूही झाले आहेत. त्याची टी20 क्रिकेटमधील फलंदाजी पाहून कोणताही संघ त्याला घ्यायला नकार करणार नाही. एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने तर म्हटले, बिग बॅश लीगसाठी तो आम्हाला परवडणार नाही. एवढा उत्तम दर्जा सूर्यकुमारने तयार केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ‘द ग्रेट क्रिकेटर’ या पॉडकास्टवर बोलताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या फलंदाजीचे वर्णन केले. त्याने म्हटले, “सूर्यकुमार यादव आम्हाला बीबीएलमध्ये परवडणार नाही. आम्हाला सर्वांना काढून टाकावे लागेल, पैसे वाचवावे लागतील आणि आशा आहे की तो सहमत असेल. हे विधान केल्यावर तो मोठ्याने हसला.”

“मला नव्हते माहित सामना सुरू आहे. मी नंतर धावफलक पाहिला.ऍरॉन फिंच याला त्याचा फोटो पाठवला आणि म्हटले हा माणूस नक्की करतोयं काय? तो पूर्णपणे वेगळ्या ग्रहावरून आलेल्यासारखी फलंदाजी करत होता. दुसऱ्यांची धावसंख्या पाहिली आणि त्याने 51 चेंडूत 11 केल्या. मी दुसऱ्याच दिवशी त्या खेळीचा रिप्ले पाहिला आणि वाटले तो आमच्याकडे असलेल्या खेळाडूंपेक्षा अधिक चांगला आहे,” असेही मॅक्सवेल पुढे म्हणाला.

भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. तेथे भारताने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी20 मालिका 1-0 अशी जिंकली. त्यातील दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारने शतकी खेळी केली. त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या. त्यावेळी त्याने मारलेल्या शॉट्सने किवी खेळाडूही त्याचे चाहते झाले. न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलन म्हणाला, “मी विराट कोहलीचा चाहता आहे, मात्र सूर्यकुमार ज्याप्रकारे खेळतो, ते उल्लेखीय आहे.” Glenn Maxwell says suryakumar-yadav- is expensive for big bash league

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तिसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेण्याच्या विचारात होतो’, मालिका जिंकल्यानंतर अर्शदीपची खास प्रतिक्रिया
हार्दिकची कॅप्टन्सी भारीच! म्हणाला,’ पूर्णवेळ नेतृत्व मिळाले तर मी माझ्या मना….’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---