---Advertisement---

Video: ‘जुन्या’ मॅक्सवेलचे मैदानात पुनरागमन; लगावले रिव्हर्स हिटचे दोन उत्तुंग षटकार

On: रविवार, सप्टेंबर 26, 2021 11:35 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) ३९ वा सामना रविवारी (२६ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. दुबईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात बंगलोरच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत निर्धारित २० षटकात धावा काढल्या. आरसीबीचा अनुभवी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने तडाखेबंद अर्धशतक झळकावले. या खेळीमध्ये त्याने दोन रिव्हर्स हिटचे षटकार लगावून चाहत्यांनी मने जिंकली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दुबईत मॅक्सवेलचे तुफान
देवदत्त पडिक्कल झटपट बाद झाल्यानंतर भरत व कर्णधार विराट कोहली यांनी बेंगलोरचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी केली. भरत बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात उतरला. त्याने पहिल्यापासूनच मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. मॅक्सवेलने मुंबईचा प्रमुख क्रिकेटपटू राहुल चहरला लक्ष करत रिव्हर्स हिटचे दोन उत्तुंग षटकार लगावले.

येथे पाहा व्हिडिओ-
https://www.iplt20.com/video/240813/switch-h-it-like-maxwell

मॅक्सवेलने या सामन्यात ३७ चेंडूत १५१ च्या स्ट्राईक रेटने ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५६ धावा बनवल्या. हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील नववे, तर आयपीएल २०२१ मधील तिसरे अर्धशतक ठरले. मॅक्सवेल प्रथमच आरसीबीसाठी आयपीएलमध्ये खेळत आहे.

https://twitter.com/NaveenG77168184/status/1442168710970503170

आरसीबीची समाधानकारक धावसंख्या
नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबी संघ या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मागील सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणारा सलामीवीर देवदत्त पडिक्कल खातेही खोलू शकलो नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या के भरतने ३२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरे केले. त्याने ५१ धावा बनविल्या. संघाचा प्रमुख फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा या सामन्यात अपयशी ठरला. ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. बेंगलोरने निर्धारित २० षटकात ६ बाद १६५ धावा काढल्या. मुंबईसाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी मिळविले.

महत्त्वाच्या बातम्या-
-भावनेच्या भरात वाहून गेला व्यंकटेश अय्यर; आऊट झाल्यानंतरही लावली डीआरएसची वाट
-CSKvsKKR: जडेजाच्या धुव्वादार खेळीने केकेआरच्या तोंडून हिसकावला सामना, सीएसकेचा २ विकेट्सने विजय
-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---