---Advertisement---

आली लग्न घटीका समीप..! मॅक्सवेलच्या विवाहाची तयारी झाली सुरू? होणाऱ्या नवरीने शेअर केला पत्रिकेचा फोटो

Glenn-Maxwell-and-Vini-Raman
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (glean maxwell) लवकरच भारताचा जावई बनणार आहे. मॅक्सवेलने मागच्या वर्षी भारतीय वंशाची विनी रमन (vini raman) हिच्यासोबत साखरपुडा केला होता. आता विनीने तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून जो फोटो शेअर केला आहे, त्यावरून स्पष्ट होते की, त्यांच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरू आहे. यापूर्वी या दोघांनी त्यांच्या लाग्नाची तारीख पुढे ढकलली होती पण यावेळी तसे होणार नाही, असे मॅक्सवेल मागच्या महिन्यात म्हणाला होता.

मॅक्सवेल मागच्या महिन्यात म्हणाला होता की, यावेळी त्याचे लग्न पुढे ढकलले जाणार नाही आणि २०२२ मध्ये दोघे एकमेकांसोबत लग्न करू.  परंतु अजूनपर्यंत या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.

विनी रमनने तिच्या इंस्टाग्राम खात्यावरून लग्नपत्रिकेचा फोटो शेअर केला असल्याने त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. लग्नपत्रिकेचा रंग गुलाबी आणि पांढरा आहे, जो अतिशय सुंदर दिसत आहे. पत्रिकेवर सगळ्यात वरती विनी आणि ग्लेन, असे लिहिलेले आहे.

तत्पूर्वी मॅक्सवेल आणि विनी मागच्या बऱ्याच दिवसांपासून एकत्र आहेत. मागच्या वर्षी मार्चमध्ये मॅक्सवेलने भारतीय वंशाची त्याची प्रेयसी विनीसोबत भारतीय परंपरेनुसार साखरपुडा केला होता. यावेळी त्यांचे जवळचे संबंधी, मित्र आणि कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते. मॅक्सवेल सध्या बिग बॅश लीग खेळत आहे आणि यावेळी त्याची होणारी पत्नी विनी देखील सामना पाहण्यासाठी अनेकदा मैदानात उपस्थित दिसली आहे. अशी माहिती मिळाली आहे की, मॅक्सवेल लग्नामुळे आगामी पाकिस्तान दौऱ्यात उपस्थित नसेल.

विनीचे इंस्टाग्राम खाते पाहिले तर, तिने मॅक्सवेलसोबत अनेक फोटो शेअर केलेले पाहायला मिळतात. २०१९ मध्ये मॅक्सवेलचे मानसिक आरोग्य ठीक नव्हते आणि त्यावेळी त्याने क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती घेतली होती. त्यावेळी विनीने मॅक्सवेलची साथ दिली आणि त्याला या  कठीण काळातून बाहेर येण्यासाठी मदत केली होती. मॅक्सवेलने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाचा ‘आफ्रिकी पाहुणचार’, ६० हेक्टरमध्ये परसलेल्या आलिशान रिसॉर्टमध्ये आहे विराट अन् कंपनीचा डेरा

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय! पाकिस्तानला आधी पळपळ पळवलं, अगदी रडवलं आणि शेवटी हरवलंच

चप्पल, चार्जर, शेकर; ईशांतची सामानाने खचाखच भरलेली बॅग पाहून विराट म्हणे, ‘जो कोणी हिला घेऊन पळून…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---