आयपीएल २०२२ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा संपन्न झाला आहे. या लिलाव सोहळ्यात एकूण ६०० खेळाडू सहभागी झाले होते. ज्यापैकी सर्व १० संघांनी मिळून ५५१ कोटी रुपये खर्च करत २०४ खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आगामी हंगामासाठी ११ कोटी रुपये खर्च करत रिटेन केले आहे. आता विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल (Glenn maxwell) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करेल अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, त्याच्या आयपीएल खेळण्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात यावेळी फाफ डू प्लेसिस, ग्लेन फिलिप्स आणि जोश हेजलवूड सारखे दिग्गज खेळाडू आहेत. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार होता. परंतु, येत्या मार्च महिन्यात तो विवाह बंधनात अडकणार आहे. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धेतील सुरूवातीच्या सामन्यांमध्ये अनुपलब्ध राहण्याची शक्यता दाट आहे.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, ग्लेन मॅक्सवेल लग्न करत असल्यामुळे आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यातून आणि पाकिस्तान दौऱ्यावरून बाहेर होऊ शकतो. त्याने फॉक्स क्रिकेटसोबत बोलताना म्हटले की, “क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत लग्न आणि वेळापत्रकाबद्दल चर्चा सुरू होती. परंतु, अचानक वेळापत्रकात बदल आल्यामुळे मी मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही.” ग्लेन मॅक्सवेलने गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी अप्रतिम कामगिरी केली होती.
ग्लेन मॅक्सवेलचे लग्न भारतीय वंशाच्या विनी रमणसोबत होणार आहे. या विवाहाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. ही लग्नपत्रिका तमिळ भाषेत छापलेली होती. २०२० मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. आता लवकरच हे दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएलच्या बाजारात एका वर्षात उतरली ‘या’ खेळाडूंची किंमत; सहन करावा लागला तोटा
टी२० मालिकेपूर्वी पोलार्डने व्यक्त केला विजयाचा विश्वास; म्हणाला…
IPL BREAKING| मुंबईकर श्रेयसकडे केकेआरची धुरा! आगामी हंगामात करणार कोलकाताचे नेतृत्व