आयपीएल २०२१ लिलावात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने १४.२५ कोटी खर्च करत आपल्या संघात समाविष्ट करून घेतलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा सध्या न्यूझीलंड विरुद्ध होत असलेल्या टी -२० मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पहिल्या २ टी -२० सामन्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलेल्या मॅक्सवेलने तिसऱ्या टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीमुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहेच. परंतु, आणखी एका कारणामुळे तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. त्याने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तिसऱ्या टी -२० सामन्यात मैदानावर आक्रमक खेळी करत ३१ चेंडूत ७० धावा करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्याधी त्याने सोशल मीडियावर आपली होणारी बायको विनी रमन हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोटो शेअर केला होता. त्याने लिहले होते की,” माझ्या होणाऱ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा”. हे दोघे ही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.
हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. साल २०१७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सोशल मीडियावर सोबतचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर त्यांनी मागीलवर्षी साखरपुडा केला होता. भारतीय मूळ असलेली विनी मॅक्सवेलला नेहमी समर्थन करत असते.
काही महिन्यांपूर्वी एका चाहत्याने सोशल मीडियावर कमेंट केले होते की,”मानसिक स्थिती असंतुलित असलेल्या गोऱ्याला सोडून टाक.” काही दिवसांपूर्वी मॅक्सवेलने मानसिक विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा विनीने ती कमेंट करणाऱ्याला चांगलेच फटकारले होते. विनी रमन ही मेलबर्नमध्ये एक फार्मसिस्ट म्हणून कार्यरत आहे.
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या २ सामन्यात मॅक्सवेलला धावा करता आल्या नाही. त्यांनतर तिसऱ्या कसोटी सामन्यात मॅक्सवेलने ३१ चेंडूत ७० धावा करत ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या खेळीत त्याने अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
सुमित नागलने नोंदवला कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय, अर्जेंटीना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
सिराजच्या ‘त्या’ सेलिब्रेशनमध्ये ‘हा’ खेळाडू कायमच असतो साथीला, सोशल मीडियावर चर्चेला उधाण
बुमराह नव्हे आयपीएलचे ‘हे’ सितारेही मागील वर्षात अडकलेत लग्नबंधनात, एक तर बनलाय बाबा