---Advertisement---

एक धाव वाचवण्यासाठी इतका धडपडला, न्यूझीलंडच्या फिलिप्सच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक करावे तितके कमीच!

On: सोमवार, नोव्हेंबर 22, 2021 12:20 AM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी फलंदाजीसाठी उतरली आणि दोघांनी पॉवरप्लेमध्ये दमदार फलंदाजी केली. दोघांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स त्याच्या क्षेत्ररक्षणामुळेही चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे

सामन्याच्या चौथ्या षटकात लॉकी फर्ग्युसनचा तिसरा चेंडू रोहित शर्माने फ्लिक केला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल असे वाटत होते पण ग्लेन फिलिप्सने अद्भुत क्षेत्ररक्षण करत चौकार अडवला. क्षेत्ररक्षण करताना त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आणि आपल्या संघासाठी १ धाव वाचवली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे.

https://twitter.com/Sunainagosh7/status/1462423076914688004?s=20

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७३ धावांनी पराभव केला. यासह भारताने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केले आहे. न्यूझीलंडवर भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी, न्यूझीलंडवर भारताचा सर्वात मोठा विजय ५३ धावांचा होता. १ नोव्हेंबर २०१७ रोजी दिल्लीत झालेल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला होता.

तत्पूर्वी, भारतीय संघाने २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या होत्या. भारताकडून रोहित शर्माने ३१ चेंडूत ५६ धावा आणि इशान किशनने २१ चेंडूत २९ धावा केल्या. श्रेयस अय्यरने २५ आणि व्यंकटेश अय्यरने २० धावा केल्या. हर्षल पटेलनेही ११ चेंडूत १८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने २७ धावांत ३ बळी घेतले. ईश सोधी, ऍडम मिलने, लोकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट यांना प्रत्येकी १-१ यश मिळाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित-ईडन गार्डन्सचे ‘अजोड’ नाते तुफानी अर्धशतकाने झाले आणखीन वृद्धिंगत

‘हिटमॅन’चं विश्वविक्रमी अर्धशतक! विराटला मागे टाकत ‘या’ यादीत रोहित पहिल्या क्रमांकावर विराजमान

माईलस्टोन अलर्ट! भारताच्या युझवेंद्र चहलसाठी कोलकाता टी२० राहिली विक्रमी, केला ‘हा’ खास किर्तीमान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---