---Advertisement---

भावा तू झोपी जा, तुला इंडियन आर्मी काहीच करणार नाही!

On: बुधवार, मे 7, 2025 11:04 AM
---Advertisement---

(22 एप्रिल 2025) रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. याबाबतीत अनेक लोकांनी संताप व्यक्त केला, त्याचबरोबर भारतीय जनतेने याचा बदला घ्यावा अशी मागणी देखील केली होती. या पाठिंब्यामध्ये अनेक भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंचा देखील समावेश आहे.

(22 एप्रिल) रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठीच बुधवारी (7 मे) पहाटे भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर 24 अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात अनुक्रमे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटांचे बालेकिल्ले असलेल्या मुरीदके आणि बहावलपूरचा समावेश आहे.

या झालेल्या घटेनंतर पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमल याने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, ‘पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान आर्मी जिंदाबाद’. या ट्विटवरती एका भारतीय वापरकर्त्याने एक कमेंट केली आहे ज्यामुळे संपूर्ण सोशल मीडियावरती धुमाकुळ माजला आहे. वापरकर्त्याने अकमलची खिल्ली उडवत असे म्हटले की, ‘अरे भाऊ तू काही दहशतवादी नाहीयेस, तुला आमची इंडियन आर्मी काही इजा पोहोचवणार नाही तू झोपी जा’

उमर अकमल याने पाकिस्तानसाठी कसोटी सामन्यात 1,003 धावा केल्या आहे तर, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 3,194 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---