मागच्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने आता अजून एक मोठी कामगिरी केली आहे. सध्या जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धे खेळली जात आहे आणि नीरजने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे. नीरजने त्याच्या पहिल्याच थ्रोमध्ये ८८.३९ मीटर लांब भाला फेकला आणि अंतिम फेरी गाठली.
पात्रता फेरीत भारताचा २४ वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) गट अ मध्ये सहभागी होता. नीरज या गटातून सर्वात पहिल्यांदा भाला फेकण्यासाठी पुढे आला होता आणि पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले. अंतिम फेरी गाठण्यासाठी खेळाडूंना पात्रता फेरीत किमान ८३.५० मीटर भाला फेकणे आवश्यक होते किंवा सर्वात लांब भाला फेकणारे १२ खेळाडू अंतिम फेरीत पोहोचणार होते. स्पर्धेची अंतिम फेरी भारतीय वेळेनुसार रविवारी (२४ जुलै) सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुरू होईल.
https://twitter.com/afiindia/status/1550278413226631170?s=20&t=H4NDSyOy2TvUgmw9X-actg
नीरज चौप्राचा आतापर्यंतचा सर्वोत लांब फेकलेला भाला ८९.४ मीटर आहे. त्याने २०१७ मध्ये लंडन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही भाग घेतला होता, पण त्याठिकाणी त्याची सर्वोत्तम कामगिरी ८२.२६ राहिली होती. त्यावेळी अंतिम फेरीत स्थान बनवण्यासाठी खेळाडूंना ८३ मीटर भाला फेकणे गरजेचे होते, त्यामुळे नीरजला अंतिम फेरीत संधी मिळाली नव्हती. परंतु आता जागतिक एथलॅटिक्स अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत त्याने स्थान बनवले आहे. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा नीरज एखाद्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान, ही एथलॅटिक्स अजिंक्यपद स्पर्धा अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये खेळली जात आहे. नीरजसह एकूण ३४ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. अ गटात सहभागी असलेला नीरज त्याच्या गटात सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला. पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक घेत नीरजने सर्वांना पुन्हा एकदा थक्क केले आहे. आता तो सुवर्णयशाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO | एक टप्पा आउट! कुटुंबातील लहान सदस्यांना शेवटपर्यंत नाही बाद झाला मोहम्मद कैफ
INDvWI। पहिल्या सामन्यातून उपकर्णधारच बाहेर, वाचा कोण घेणार संघात जडेजाची जागा?