भारतीय संघाचा जबरदस्त वेगवान गोलंदाज उमेश यादव हा सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. त्याने दीर्घ काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील आपल्या पहिल्याच सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती. 35 वर्षीय उमेशच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. अशातच आता उमेशच्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. उमेश यादव वडील बनला आहे.
उमेश यादव बनला वडील
उमेश यादव (Umesh Yadav) याच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. उमेश यादवची पत्नी तान्या यादव (Tanya Yadav) हिने मुलीला जन्म दिला आहे. आता उमेश यादव वडील बनला (Umesh Yadav Becomes Father) आहे. बुधवारची 8 मार्च ही तारीख उमेशच्या आयुष्यातील यादगार तारीख बनली आहे. त्याने वडील बनल्याची माहिती त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे. जोडपे खूपच खुश झाले आहेत. चिमुकलीच्या आगमनाने उमेश यादवचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
उमेश यादवची सोशल मीडिया पोस्ट
उमेश यादव याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बुधवारी (दि. 8 मार्च) पोस्ट शेअर केली. त्याने पोस्टला कॅप्शन देत लिहिले आहे की, “कन्यारत्नाची प्राप्ती.” त्याच्या पोस्टवर चाहते आणि क्रिकेटपटूंकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Blessed with baby girl ❤️ pic.twitter.com/nnVDqJjDGs
— Umesh Yaadav (@y_umesh) March 8, 2023
उमश यादवच्या खांद्यावर मुलीची जबाबदारी
उमेश यादव आणि तान्या यादव (Umesh Yadav And Tanya Yadav) यांनी सन 2013मध्ये संसार थाटला होता. सन 2021मध्ये तान्या हिने एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला होता. आता उमेशच्या खांद्यावर दोन मुलींची जबाबदारी आली आहे. उमेशने यापूर्वी अनेकदा मुलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच झाले होते वडिलांचे निधन
उमेश यादव याच्यावर मागील काही दिवसांपूर्वीच दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याचे वडील तिलक यादव (Tilak Yadav) यांचे 13 दिवसांपूर्वी म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उमेशला पत्र लिहून त्याचे सांत्वन केले होते.
उमेश यादवचा विक्रम
उमेश यादवच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटीतील त्याच्या पहिल्याच सामन्यात 2 षटकार मारून विक्रमवीर बनला. त्याने भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात विराट कोहली याची बरोबरी केली आहे. आता दोघांच्या नावावर प्रत्येकी 24 षटकारांची नोंद आहे. (good news cricketer umesh yadav and his wife tanya are blessed with a baby girl)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराहबाबत मोठी ब्रेकिंग! न्यूझीलंडमधील सर्जरीविषयी महत्त्वाची माहिती आली समोर
ज्या दिग्गजांसोबत खेळला, डिविलियर्सने त्यांनाच केले दुर्लक्षित; म्हणाला, ‘हाच’ टी20चा महान खेळाडू