भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बुधवारी (7 जुलै) 40 वा वाढदिवस झाला. याच दरम्यान धोनीसाठी इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा हंगाम शेवटचा असल्याची चर्चा रंगली होती. कारण, आयपीएल २०२२ साठी मोठा लिलाव होणार आहे. त्यामुळे, धोनीचे वय पाहाता तो आता खेळणार नसल्याची चर्चा होती. मात्र, आता सीएसकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
एमएस धोनी इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा होती. परंतु, आता धोनी सीएसके संघासोबत आणखीन एक ते दोन वर्ष राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही माहिती सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी दिलेली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी आयएएनएसला माहिती देताना सांगितले की, ‘महेंद्रसिंग धोनी संघासोबत आणखीन एक किंवा दोन वर्षापर्यंत राहणार आहेत. धोनी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो खूप सराव देखील करतो. तो आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचे कोणतेही कारण सध्या तरी दिसत नाही.’
आयपीएल 2021 च्या हंगामातील उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहेत. या उर्वरित सामन्यांत देखील चेन्नईचे नेतृत्व धोनी करणार आहे. सीएसकेने या हंगामात आतापर्यंत 7 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला असून गुणतालिकेत दुसर्या स्थानावर आहे.
धोनी उत्कृष्ट फिनिशर आहे
धोनी आता अगोदर सारखा उत्कृष्ट फिनिशर आहे की नाही यावर सातत्याने चर्चा होत असते. परंतु सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाचे असे मत आहे की, धोनीकडे अजूनही डाव पूर्ण करण्याची अगोदर इतकीच क्षमता आहे आणि संघाच्या योजनांसाठी धोनी संघात असणे अत्यावश्यक आहे.
विश्वनाथन यांचे असे मत आहे की, ‘जिथपर्यंत आमचा प्रश्न आहे, धोनी सीएसकेसाठी जे काही करत आहे, यासाठी आम्हाला खूप आनंद होत आहे. धोनी फक्त कर्णधार आहे म्हणून नाही तर त्याच्याकडे सर्वात जास्त अनुभव आहे आणि त्याचबरोबर तो एक मार्गदर्शक म्हणून खूप चांगला खेळाडू आहे. आम्हाला वाटते की, तो अजूनही चांगला खेळू शकतो. इतकेच नव्हे तर धोनी एक खेळाडू म्हणून संघाला महत्त्व देखील देतो. तो एक उत्तम फिनिशर देखील आहे आणि तो हे सर्व आमच्यासाठी करत आहे.’
सीएसके म्हणजे धोनी
भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक विजय दहिया हे दोन वेळा आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रशिक्षक होते. विजय दहिया यांचे असे मत आहे की, “सीएसके म्हणजे एमएस धोनी आहे आणि एमएस धोनी म्हणजे सीएसके आहे.” धोनी जवळ टी 20 क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. आयपीएल 2021 च्या हंगामात धोनीने उत्कृष्ट कर्णधारपद निभावली आहे. तसेच धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुझे शेजारचे आता हाय अलर्टवर असतील’, दिनेश कार्तिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर दिग्गजाने घेतली मजा
मायकल वॉन स्वत:लाच म्हणाला, ‘४६ वर्षांचा मॉडेल’; जडेजाने दिली भन्नाट प्रतिक्रिया
अखेर उपरती झाली! उमर अकमलने ‘त्या’ चूकीबद्दल व्हिडिओ शेअर करत मागितली सर्वांची माफी