इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league) 2025 चे संपूर्ण वेळापत्रक कधी जाहीर केलं जाणार याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. एका रिपोर्टच्या म्हणण्यानुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डकडून सोमवारी आयपीएल 2025 स्पर्धेचं पूर्ण वेळापत्रक समोर येऊ शकत. वेळापत्रकाबरोबरच सामन्यांच्या ठिकाणाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ त्यांचे दोन सामने विजाग मध्ये खेळू शकते. याबरोबरच धर्मशाळा आणि गुवाहाटीमध्येही सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते.
क्रिकबजच्या एका अहवालानुसार, बीसीसीआय सोमवारी इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करू शकते. स्पर्धा मार्चमध्ये सुरू होणार आहे. दिल्ली कॅपिटल संघ मागच्या हंगामाप्रमाणे याही वर्षी त्यांच्यासाठी दोन होम ग्राउंड ठेवेल. दिल्लीचा संघ दिल्लीशिवाय तसेच विशाखापटनम मध्येही त्यांचे सामने खेळेल. राजस्थान रॉयल्स सुद्धा जयपुर सोबत गुवाहाटीमध्ये त्यांचे सामने खेळेल.
आयपीएलच्या सर्व संघांकडे त्यांचे घरचे मैदान आहे. त्याशिवाय या हंगामात अजून काही ठिकाणे सामन्यांसाठी निवडली जाऊ शकतात. या हंगामातील सामने लखनऊ, कोलकाता , जयपूर, दिल्ली, मुंबई, गुवाहाटी, धर्मशाळा आणि चेन्नईमध्ये खेळले जाऊ शकतात. तसेच बंगळुरू आणि हैदराबाद मध्येही सामन्यांचे आयोजन होऊ शकते. पंजाब किंग्स धर्मशाळाच्या स्टेडियममध्ये दोन किंवा तीन सामने खेळू शकते. तसेच राजस्थान संघ गुवाहाटीमध्ये दोन सामने खेळू शकतो.
आयपीएल 2025चा अंतिम सामना 25 मे रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मध्ये खेळला जाऊ शकतो. मागच्या हंगामात कोलकत्ता नाईट रायडर्स हा संघ विजयी ठरला होता. कोलकाताने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. पण या वेळेस केकेआर संघाला ट्रॉफीपर्यंत पोहोचणे सोपं नसणार आहे. मेगा लिलावा दरम्यान काही खेळाडूंचा संघ बदलला आहे याचा संघाच्या खेळावरही प्रभाव पडू शकतो.
हेही वाचा-
“राशिद खानचा खेळ वसीम अक्रमच्या हद्दीला ओलांडतो, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची मोठी दखल.”
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष व्यवस्था, आयसीसीची मोठी घोषणा
इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ओपनर फिट






