क्रीडाविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. बीडमधील परळीच्या श्रद्धा गायकवाड हिने सर्वांची छाती गर्वाने फुगेल असं काम केलं आहे. गुजरात येथे पार पडत असलेल्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022मध्ये श्रद्धाने सुवर्णपदक आपल्या नावावर केले आहे. विशेष म्हणजे, श्रद्धाची स्केट बोर्डिंग क्रीडा प्रकारात अफलातून कामगिरी केल्यामुळे फ्रान्समध्ये होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकसाठी भारताच्या संघात निवड झालीये. आता श्रद्धावर कौतुकांचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. छोट्याशा गावातून आलेल्या श्रद्धाने अवघ्या महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
महत्त्वाचं म्हणजे, परळी (Parli) या गावातून ऑलिम्पिकसाठी निवडली जाणारी श्रद्धा गायकवाड (Shraddha Gaikwad Selected For Olympics) ही पहिलीच खेळाडू बनली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत श्रद्धा रवींद्र गायकवाड (Shraddha Ravindra Gaikwad) हिने स्केट बोर्डिंग या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. तिचे वडील परळी गावचे रहिवासी आहेत. ते सिक्युरिटी गार्डचे काम करतात, त्यामुळे श्रद्धाचे हे यश तिच्या कुटुंबासोबतच आख्ख्या परळीची छाती गर्वाने फुगवणारे आहे. तिच्या या यशानंतर तिच्यावर राजकीय वर्तुळातून कौतुक तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धनंजय मुंडेनी ट्वीट करत केले अभिनंदन
राष्ट्रवादी पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत श्रद्धाचे अभिनंदन केले. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “अभिमानास्पद! आमच्या परळीतील गायकवाड कुटुंबाची कन्या कु. श्रद्धाने अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटबोर्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारतीय ऑलिम्पिक स्थान निश्चित केले आहे.” तसेच, त्यांनी पुढे लिहिले की, “खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या पित्याला आणि आम्हा तमाम परळीकरांना तुझा अभिमान वाटतो श्रद्धा. आगामी काळातील फ्रांस ऑलिम्पिकमध्ये तू जगात परळीचे नाव करशील हा विश्वास आहे.”
https://twitter.com/dhananjay_munde/status/1578011233688715265?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1578011233688715265%7Ctwgr%5E789451e656bc516c97dfadfb6f0dc472a47fda6a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fbeed-news-shraddha-gaikwad-won-gold-medal-at-national-games-2022-also-selected-for-the-olympics-1107981
आख्ख्या भारतात गाजवलं गावाचं नाव
सुवर्णपदक विजेती श्रद्धा गायकवाड हिने आपल्या सुवर्ण कामगिरीने परळी गावाचं नाव आख्ख्या भारतात गाजवलं आहे. रवींद्र गायकवाड यांचे गाव परळी आहे. मात्र, पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी ते पुण्यातील एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. अशात या कठीण परिस्थितीतही श्रद्धाने जबरदस्त यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, तिच्या स्केटिंगसाठीच्या जिद्दीमुळे तिला नेटफ्लिक्सवरील ‘स्केटर गर्ल’ या सिनेमातही काम करण्याची संधी मिळाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बघा बघा आमच्यावर किती टीका होते’, पीसीबीच्या अध्यक्षांकडे बाबर आझमने केलेली तक्रार
‘भुवीपेक्षा दीपकची बॉलिंग भारीच’, दिग्गज गोलंदाजाचे चकीत करणारे विधान