भारतीय महिला अंध क्रिकेट संघ आपल्या शानदार प्रदर्शनाने जगभरात डंका वाजवत आहे. मागील काही वर्षांमध्ये भारताच्या अंध क्रिकेट संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. अशात याच संंघाने 140 कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने आयबीएसए वर्ल्ड गेम्स 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात एन्ट्री केली आहे. ऑस्ट्रेलिया संघाला तब्बल 163 धावांनी पराभवाचा धक्का देत भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. अशाप्रकारे त्यांनी अंध क्रीडा प्रकारात अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बनण्याचा मानही मिळवला आहे.
भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने रचला इतिहास
झाले असे की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय महिला अंध क्रिकेट (Indian Women’s Blind Cricket Team) संघाची कर्णधार वर्षा उमापती हिने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामी फलंदाजांनी शानदार सुरुवात केली.
भारताने 6व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पहिली विकेट गमावली. यावेळी सलामी फलंदाज बी हांसदाला तंबूचा रस्ता धरावा लागला. त्यानंतर प्रत्येका आशा होती की, एस दास आणि दीपिका टीसी दोघी डाव सावरतील. मात्र, त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. कारण, दीपिका धावबाद होऊन तंबूत परतली. यानंतर भारताकडून जी नीलप्पा आणि एस दास यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 184 धावांची मोठी भागीदारी झाली. अशाप्रकारे भारताने 245 धावांचा महाकाय डोंगर उभारला.
A historic day for India…🇮🇳
Indian Women's Blind cricket team has qualified into the final of IBSA World Games 2023. pic.twitter.com/FUuS6QLQMV
— Johns. (@CricCrazyJohns) August 24, 2023
भारतीय महिला अंध संघाने 163 धावांनी जिंकला सामना
तब्बल 246 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानेही दमदार सुरुवात केली. मात्र, त्यांनी सलामी फलंदाज सी लुईसची विकेट लवकर गमावली. प्रियाने 34 धावांची सुरुवाती भागीदारी तोडली आणि भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने 35 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. अशाप्रकारे भारताने ऑस्ट्रेलियाला 163 धावांनी पराभूत केले. तसेच, अंतिम सामन्याचे तिकीटही मिळवले. स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (दि. 26 ऑगस्ट) इंग्लंडविरुद्ध खेळला जाणार आहे. (good news team india womens blind cricket team enters final in ibsa world games 2023 read here)
हेही वाचा-
जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये फायनल! विजेतेपदासाठी नीरज आणि अरशदमध्ये टक्कर
अखेर बीसीसीआयचे ‘हे’ पदाधिकारी जाणार पाकिस्तानात! आशिया कप सामन्याला लावणार हजेरी