---Advertisement---

टोमणे मारण्यात पटाईत; भारतीय महिला संघाची स्तुती करताना वॉनचा विराटसेनेला टोमणा

On: गुरूवार, जुलै 1, 2021 10:41 AM
---Advertisement---

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन त्याच्या स्पष्टपणे बोलण्याच्या वृत्तीमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असतो. त्यातही तो सातत्याने भारतीय संघाविरोधी भाष्य करत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर येत असतो.

सध्या भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात वनडे मालिका खेळली जात आहे. बुधवारी (३० जून) या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. यजमानांनी ५ विकेट्स राखून हा सामना जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भलेही भारताने हा सामना गमावला; परंतु त्यांनी त्यांचे सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला. भारतीय महिलांच्या प्रदर्शनाने इंग्लंडचा दिग्गज मायकल खूप प्रभावित झाल्याचे दिसून आले. त्याने भारतीय महिला क्रिकेटपटूंची स्तुती करताना पुरुष क्रिकेटपटूंची अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करताना त्याने लिहिले आहे की, ‘आज भारताच्या महिला क्रिकेटपटू खूपच अप्रतिम प्रदर्शन करत आहेत. कमीत कमी भारताचा एक तरी क्रिकेट संघ इंग्लंडच्या परिस्थितीत इतके चांगले खेळताना दिसत आहे, हे पाहून बरे वाटले.’ पुढे त्याने चिडवतानाचे दोन इमोजीही टाकले आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय ताफ्यावर टिका करण्याची ही वॉनची पहिली वेळ नाही. यापुर्वी भारताने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना गमावल्यानंतरही त्याने खेळाडूंसह चाहत्यांवरही निशाणा साधला होता.

दरम्यान भारतीय महिलांनी दुसरा वनडे सामना जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ५ विकेट्सने पराभवास सामोरे जावे लागले. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी भारताला प्रणम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताकडून कर्णधार मिताली राज हिने सर्वाधिक ५९ धावा केल्या. तसेच सलीमीवीर शेफाली वर्मा (४४ धावा) आणि स्म्रीती मंधाना (२२ धावा) यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली. यामुळे भारताने इंग्लंडला २२२ धावांचे लक्ष्य दिले.

या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडकडून मधल्या फळीतील फलंदाज सोफिया डन्कले हिने सर्वाधिक नाबाद ७३ धावांची खेळी केली. तिला कॅथरिन ब्रंट (नाबाद ३३) हिची साथ मिळाली. तसेच सलामीवीर लॉरेन हिल हिनेही ४२ धावा चोपल्या आणि ४७.३ षटकातच सामना जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

कुलदीप यादवसाठी श्रीलंका दौरा ठरेल शेवटची संधी, संघात स्थान मिळण्याबाबत दिली ‘ही’ प्रतिक्रिया

विश्वविजेत्या टी२० संघातील ‘हे’ २ भारतीय धुरंधर पुन्हा घडवणार इतिहास, गाजवणार २०२१चा वर्ल्डकप

पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून ‘या’ भारतीय खेळाडूला विश्रांती!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---