दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. स्मिथने 2 नोव्हेंबर रोजी आपली प्रेयसी रोमी लॅनफ्रांचीशी लग्न केले.
38 वर्षीय स्मिथने सोमवारी त्यांच्या लग्नाचा फोटो ट्विट केला आहे. 2 नोव्हेंबर हा एक चांगला दिवस होता, असे स्मिथने ट्विटमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी ऑगस्ट 2011 मध्ये स्मिथने केप टाऊनमध्ये आयरिश गायक मॉर्गन डीनबरोबर लग्न केले होते. या दोघांनाही दोन मुले आहेत. तथापि, फेब्रुवारी 2015 मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.
डिसेंबर 2016 मध्ये स्मिथची सध्याची पत्नी रोमीने त्यांच्या एका मुलाला जन्म दिला.
2 November was an incredible day!!❤️
#wedding #love #beloftebos #family #friends #blendedfamily #Celebrations ???????? pic.twitter.com/8Ft5R9xM1r— Graeme Smith (@GraemeSmith49) November 4, 2019
दक्षिण आफ्रिकेचा सर्वात युवा कर्णधार ठरण्याचा विक्रम स्मिथच्या नावावर आहे. स्मिथने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 117 कसोटी सामने खेळले. त्यात 48.25 च्या सरासरीने 9265 धावा केल्या आहेत.
तसेच त्याने 197 वनडे सामन्यात स्मिथने 6989 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या 10 शतके आणि 47 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये स्मिथची सर्वोच्च धावसंख्या 141 आहे.
33 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये स्मिथने पाच अर्धशतकांसह 31.67 च्या सरासरीने 982 धावा केल्या आहेत.
स्मिथने 2002 मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता तर त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2014 मध्ये खेळला. मार्च 2014 मध्ये केपटाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला कसोटी सामना हा स्मिथचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.






