‘मिस्टर ३६०’ अशी ओळख मिळवलेला एबी डिविलियर्स हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणला जातो. सध्या तरी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो जगभरातील विविध व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळताना दिसतो. नुकताच तो कोरोनाच्या प्रभावामुळे अनिश्चिच काळासाठी स्थगित झालेल्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात खेळताना दिसला होता. या हंगामात त्याने अनेकदा तुफानी खेळी केल्या. त्यामुळे, त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दलच्या चर्चा पुन्हा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
त्यातच आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा संचालक ग्रॅमी स्मिथनेही डिविलियर्सच्या पुनरागमनाबद्दल संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की जूनमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात डिविलियर्सचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होऊ शकते.
खरंतर मे महिन्यात २०१८ साली डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर अनेकदा त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबद्दलच्या चर्चा रंगल्या. त्यातच डिविलियर्सची व्यावसायिक टी२० लीग स्पर्धेतील कामगिरी चांगली होत असल्याने त्याच्यात आणखी क्रिकेट शिल्लक असल्याने त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करावे, असे मत अनेकांनी मांडले होते.
तसेच मागील महिन्यातच दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने डिविलियर्स टी२० विश्वचषकासाठी संघात पुनरागमन करु शकतो, असे संकेत दिले होते. त्यावर डिविलियर्सनेही सकारात्मक प्रतिक्रिया देताना म्हटले होते की आयपीएलनंतर याबद्दल तो बाऊचर यांच्याशी चर्चा करेल.
यानंतर एक महिन्याने आता ग्रॅमी स्मिथनेही डिविलियर्स बरोबरच ख्रिस मॉरिस आणि इम्रान ताहिर यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० पुनरागमनाचे संकेत दिले आहे. स्मिथच्या म्हणण्यानुसार या खेळाडूंच्या पुनरागमनामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघाला मजबुती मिळेल. स्मिथने दक्षिण आफ्रिकेच्या वेस्ट इंडिज दौऱ्याबद्दल घोषणा करताना याबद्दल भाष्य केले. याबद्दल कॅरिबियन क्रिकेट पॉडकास्टने माहिती दिली आहे. स्मिथने असेही म्हटले आहे की तिन्ही क्रिकेटपटूंना त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वातंत्र्य आहे.
दक्षिण आफ्रिका जूनमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात २ कसोटी आणि ५ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यादरम्यान स्मिथने संकेत दिल्याप्रमाणे ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत डिविलियर्स खेळताना दिसू शकतो.
🚨BREAKING NEWS🚨
Cricket South Africa Director Graeme Smith has today confirmed that SA will travel to WI in June for 2 Tests and 5 T20is at venues yet to be finalised
He also said he is hopeful of free agents AB De Villiers, Imran Tahir and Chris Morris playing pic.twitter.com/LLEJbQwXJG
— Caribbean Cricket Podcast (@CaribCricket) May 6, 2021
डिविलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
एबी डीविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ धावा तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत २ आणि वनडेत ७ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने यष्टीरक्षण करताना २१९ बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी सौंदर्यवतीने भारतीयांनाही लावलं याड, झालं असं काही की होऊ लागली अनुष्काशी तुलना
काही दिवसांपूर्वी आर्चरच्या हातात घुसला होता काचेचा तुकडा, आता करतोय तुफानी फटकेबाजी, पाहा व्हिडिओ