ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या 13 व्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. त्याने या हंगामात अतिशय खराब कामगिरी केली आहे. खराब कामगिरीनंतरही त्याला संघात स्थान दिले जात आहे. धावा काढण्यात अपयशी ठरल्यानंतरही मॅक्सवेलला संघात स्थान दिल्यामुळे इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वान याने प्रश्न उपस्थित केला आहे.
एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना स्वान म्हणाला की, “ग्लेन मॅक्सवेलला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी बक्कळ पैसा मिळाला आहे पण मिळालेल्या रकमेनुसार त्याने कामगिरी केलेली नाही. त्याला संघात स्थान मिळाल्यामुळे मला आश्चर्य वाटले. त्याने इंग्लंडमध्ये खेळताना ऑस्ट्रेलियासाठी चांगली कामगिरी केली आहे आणि आता त्याला पंजाबचीही जबाबदारी स्वीकारावी लागेल.”
मॅक्सवेलची आयपीएलच्या या हंगामातील कामगिरी
आयपीएलच्या या हंगामात ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या कामगिरीमुळे सर्वांनाच निराश केले आहे. मोठे फटके खेळण्यातही त्याला अपयश आले आहे. त्याने आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत एकूण सात सामने खेळले आहेत आणि त्याने फक्त 58 धावा केल्या आहेत. त्याच्या या आकडेवारीनंतर त्याला संघात स्थान द्यावे की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तथापी प्रत्येक सामन्यात तो धावा करेल अशी अपेक्षा चाहत्यांना असते. वेगवान खेळी खेळण्यासाठी ओळखल्या जाणार्या या खेळाडूने बरेच प्रयत्न केले पण त्याला अद्याप यश मिळू शकले नाही.
त्याच्या गोलंदाजीनेही सर्वांनाच निराश केले आहे. या हंगामात त्याने केवळ 1 गडी बाद केला आहे. या हंगामात त्याचा इकॉनॉमी रेट 9.28 आहे. आगामी सामन्यांमध्ये ग्लेन मॅक्सवेलला संघात स्थान मिळेल की नाही हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-“१० कोटी नाही तर त्याची किंमत…”, माजी भारतीय क्रिकेटरने साधला मॅक्सवेलवर निशाना
-गेम आहे मिलीमीटर! फक्त काही इंचांनी हुकला मॅक्सवेलचा षटकार नाहीतर…
-वाढदिवशी शुबमनकडून साराला नाही मिळालं हवं ते गिफ्ट, मग काय झालं नक्कीच पाहा
-भल्या- भल्यांवर ठरली विराट- डिविलियर्सची जोडीच वरचढ, गाठला पहिला नंबर
ट्रेंडिंग लेख-
-“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?