वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने काल (26 सप्टेंबर) गुरुवारी रात्री क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. दुखापतीमुळे कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 मधून बाहेर पडल्यानंतर ब्राव्होने ही घोषणा केली. यापूर्वी त्याने या हंगामानंतर सीपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. परंतु दुखापतीमुळे त्याला मध्येच बाहेर पडावे लागले. ब्राव्होने सोशल मीडियावर एका भावनिक पोस्टद्वारे निवृत्तीची माहिती दिली. या खेळाडूने 2021 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आधीच अलविदा केला होता. पण तो फ्रँचायझी क्रिकेट सतत खेळत होता.
जर आपण ड्वेन ब्राव्होच्या टी20 क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली. तर त्याने 2006 पासून या फॉरमॅटमध्ये खेळायला सुरुवात केली आणि त्याची कारकीर्द 2024 पर्यंत टिकली. दरम्यान त्याने अनेक ट्रॉफी जिंकल्या. त्यासोबतच काही अविश्वसनीय विक्रमही आपल्या नावावर केले. ब्राव्होने 582 सामन्यात 631 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय फलंदाजीत 6970 धावा केल्या.
40 वर्षीय ड्वेन ब्राव्हो हा T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे आणि या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याने अलीकडच्या काळापासून कोचिंगच्या भूमिकेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि यावर्षी टी20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानसोबत याची उदाहरणे आपण पाहिली.
ब्राव्होने सीपीएल आणि आयएलटी20 खेळत होता. चालू मोसमानंतर सीपीएलमधून निवृत्ती घेण्याची त्याने योजना आखली होती. तर त्याला कायम ठेवण्यात आल्याने आगामी हंगामात तो मुंबई अमिरातीकडून आंतरराष्ट्रीय लीग टी20 मध्ये खेळणार होता. मात्र सेंट लुसिया किंग्जविरुद्ध त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळताना त्याला दुखापत झाली. याच कारणामुळे त्याने आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला पूर्णपणे निरोप दिला आहे.
View this post on Instagram
ड्वेन ब्राव्होने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून निवृत्तीची माहिती दिली. त्याने पोस्ट मध्ये लिहिले की, एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून एकवीस वर्षांचा हा अविश्वसनीय प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी माझे स्वप्न जगू शकलो कारण मी प्रत्येक टप्प्यावर माझे 100 टक्के दिले. हे नाते पुढे चालू ठेवायला मला जितके आवडेल तितकेच वास्तवाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. माझे मन पुढे चालू ठेवू इच्छित आहे, परंतु माझे शरीर यापुढे वेदना, ब्रेकडाउन आणि तणाव सहन करू शकत नाही. मी स्वत:ला अशा स्थितीत ठेवू शकत नाही जिथे मी माझ्या संघसहकाऱ्यांना, माझ्या चाहत्यांना किंवा मी ज्या संघांचे प्रतिनिधित्व करतो त्या संघांना निराश करू शकत नाही. त्यामुळे जड अंत:करणाने मी अधिकृतपणे खेळातून निवृत्ती जाहीर करत आहे. आज चॅम्पियनने निरोप घेतला.
हेही वाचा-
147 वर्षांच्या इतिहासात असं कधीच घडलं नाही, श्रीलंका-न्यूझीलंड सामन्यात हा मोठा पराक्रम
कानपूर कसोटीसाठी कशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन? सहाय्यक प्रशिक्षक नायर म्हणाले…
शाकिबला मायदेशात परतण्याची वाटतेय भीती, बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे केली सुरक्षेची मागणी