---Advertisement---

द्रविडबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल केएल राहुलने केले मोठे भाष्य; म्हणाला…

On: शनिवार, जानेवारी 18, 2020 6:29 PM
---Advertisement---

राजकोट। काल (17 जानेवारी) भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या वनडेत 36 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताचा फलंदाज केएल राहुलने 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत आक्रमक खेळ करताना 52 चेंडूत 80 धावांची खेळी केली.

तसेच त्याने या सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या रिषभ पंतऐवजी या सामन्यात यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळली. त्याने काल यष्टीरक्षण करताना 1 यष्टीचीत केले आणि 2 झेल घेतले. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

त्याचबरोबर राहुलने मंगळवारी(14 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडेतही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली होती. त्याचमुळे त्याची सध्या भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडबरोबर तुलना होत आहे. कारण द्रविडही संघाच्या गरजेनुसार फलंदाजी बरोबरच यष्टीरक्षणही करायचा.

त्यामुळे द्रविड बरोबर होत असलेल्या तुलनेबद्दल केएल राहुल म्हणाला, ‘त्याच्यासारख्या (द्रविडसारख्या) फलंदाजाबरोबर तुलना होणे ही सन्मानाची गोष्ट आहे. अनेक वर्षांपासून अशी तुलना होत आहे.’

‘तो राहुल द्रविड आहे आणि मी राहुल, त्याचमुळे नेहमी तुलना होते. तो असा एक व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर मी अनेकदा क्रिकेट, फलंदाजीवर चर्चा करताना वेळ घालवला आहे. तसेच तोही मी ज्या राज्यातून(कर्नाटक) आलो त्याच राज्यात राहतो.’

तसेच केएल राहुल पुढे म्हणाला, ‘माझ्याकडे त्याला कॉल करुन किंवा त्याला भेटून त्याच्याशी फलंदाजी किंवा क्रिकेटविषयी चर्चा करण्याची संधी आहे. तो यासाठी नेहमी तयार असतो.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---