---Advertisement---

IPL 2025: डाॅट बाॅल टाकणारा बादशाह ठरला ‘हा’ खेळाडू..! ट्राॅफीसहित मिळाली मोठी रक्कम

On: बुधवार, जून 4, 2025 4:00 PM
---Advertisement---

IPL 2025 Awards: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 17 वर्षांचा आयपीएल ट्राॅफीचा वनवास संपवून 18व्या वर्षी ट्राॅफीवर आपले नाव कोरले. फायनलमध्ये पंजाब किंग्जला 6 धावांनी धूळ चारत त्यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला. बंगळुरू संघाने संपूर्ण हंगामात दमदार खेळ केला, परंतु हंगामात सर्वाधिक डॉट बॉल फेकणारा खेळाडू बंगळुरूचा नाही. गुजरात टायटन्सकडून खेळणारा मोहम्मद सिराजला ग्रीन डॉट बॉल ऑफ द सीझन पुरस्कार मिळाला आहे. सिराज 2024 पर्यंत आरसीबीकडून खेळत होता. (Green Dot Ball of the Season Mohammed Siraj)

मोहम्मद सिराजने आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकले आहेत. गुजरात टायटन्सने मेगा लिलावात सिराजला 12.5 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने संपूर्ण हंगामात 15 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या. सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये गुजरातचा प्रसिद्ध कृष्णा दुसऱ्या स्थानावर होता. कृष्णाने हंगामात 146 डॉट बॉल टाकले होते. या हंगामात सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या मोहम्मद सिराजला ‘ग्रीन डॉट बॉल ऑफ द सीझन’ पुरस्कार मिळाला. या कामगिरीसाठी त्याला ट्रॉफीसह 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.

मोहम्मद सिराज हा सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज होता, तर त्याचा संघसहकारी प्रसिद्ध कृष्णा देखील दुसऱ्या स्थानावर होता. तिसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जचा खलील अहमद होता. अहमदने 14 सामन्यांमध्ये 137 डॉट बॉल टाकले होते, तर चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. चौथ्या स्थानावर असलेल्या अर्शदीप सिंगनेही 137 डॉट बॉल टाकले. पाचव्या स्थानावर जसप्रीत बुमराह होता, ज्याने 12 सामन्यांमध्ये 128 डॉट बॉल टाकले.

सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे टाॅप-5 खेळाडू

मोहम्मद सिराज (जीटी) – 151 डॉट बॉल
प्रसिध कृष्ण (जीटी) – 146 डॉट बॉल
खलील अहमद (CSK)- 137 डॉट बॉल
अर्शदीप सिंग (पीबीकेएस) – 137 डॉट बॉल
जसप्रीत बुमराह (MI) – 128 डॉट बॉल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---