---Advertisement---

युवा ग्रीनची झुंज जडेजाने संपवली, असा घेतला भन्नाट झेल

On: मंगळवार, डिसेंबर 29, 2020 7:55 AM
---Advertisement---

मेलबर्न। शनिवारपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना या दोन देशांतील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात युवा कॅमेरॉन ग्रीनने ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर चिवट झुंज दिली. मात्र मंगळवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी (२९ डिसेंबर) रविंद्र जडेजाने त्याचा झेल घेत ही झुंज संपवली.

झाले असे की ९१ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने मोहम्मद सिराजविरुद्ध पूल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र मिड-विकेटला क्षेत्ररक्षण करणाऱ्या रविंद्र जडेजाने कोणतीही चूक न करता हा झेल अचूक पकडला. त्यामुळे ग्रीनला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. ग्रीनने १४६ चेंडूत ४५ धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकारांचा समावेश आहे.

याबरोबरच ग्रीनने पॅट कमिन्ससह सातव्या विकेटसाठी ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला आघाडी घेण्यात यश आले.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर संपूष्टात आला असून त्यांना ६९ धावांची आघाडी मिळाली आहे. त्यांच्याकडून या डावात ग्रीनने सर्वाधिक धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ मॅथ्यू वेडने ४० धावांची खेळी केली. आता भारतासमोर हा सामना जिंकण्यासाठी ७० धावांचे आव्हान आहे. भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

हिटमॅन आला रे! तिसऱ्या कसोटीआधी रोहित शर्मा ‘या’ दिवशी होणार टीम इंडियात सामील

रहाणेच्या शतकानंतर टीम इंडिया ‘अजिंक्यच’, पाहा काय आहे आकडेवारी

‘त्याला’ बाद देणे चूकीचेच, मॅथ्यू वेडने व्यक्त केली नाराजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---