भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये भारतानं 280 धावांनी शानदार विजय मिळवला.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची खूप क्रेझ पाहायला मिळाली. केवळ चाहतेच नव्हे तर ग्राउंड स्टाफही कोहलीचे फॅन आहेत. सामन्याच्या एक दिवस आधी कानपूरमध्ये खूप पाऊस पडला होता. त्यामुळे मैदानावरील कर्मचारी आदल्या दिवशी खूप व्यस्त दिसत होते.
सामन्याच्या दिवशी, जेव्हा भारतीय संघ वॉर्मअप करत होता आणि कव्हर काढले जात होते, तेव्हा ग्राउंड स्टाफपैकी एक जण आला आणि त्यानं विराट कोहलीच्या पायाला स्पर्श केला. विराटनं तत्काळ थांबून ग्राउंड स्टाफला तसं करण्यापासून रोखलं. यानंतर विराट खेळपट्टीच्या दिशेने गेला.
विराटसाठी अशा घटना काही नव्या नाहीत. चाहत्यांनी सुरक्षेचा घेरा तोडून विराटशी हस्तांदोलन केल्याचं किंवा त्याच्या पायाला स्पर्श केल्याचं यापूर्वी अनेकदा घडलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
VIRAT KOHLI – THE CROWD FAVOURITE.
– A groundstaff memeber touched Virat’s feet when he came to practice. 🥹❤️pic.twitter.com/MkC4zeewcO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2024
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, विराट भारतासाठी पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात विशेष काही करू शकला नाही. त्यामुळे कानपूरमधील चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघानं आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
कानपूरमध्ये टीम इंडिया तीन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाजांच्या जोडीनं मैदानात उतरू शकते, असं मानलं जात होतं, परंतु तसं झालं नाही. भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांच्या जोडीनं मैदानात उतरला आहे. कानपूरमधील कसोटी सामन्यादरम्यान अधूनमधून पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –
संघाचा मोठा निर्णय! ड्वेन ब्राव्हो घेणार गौतम गंभीरची जागा…
ind vs ban; टीम इंडियाचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; संघात मोठे बदल!
आयपीएल 2025 मध्ये सामन्यांची संख्या वाढणार? बीसीसीआयचा मोठा निर्णय!