---Advertisement---

रोहितचा सराव सत्रातील जोरदार फटक्याने ग्राऊंड्समनला दुखापत, त्यानंतर हिटमॅनच्या हृदयस्पर्शी कृतीने वेधले सर्वांचे लक्ष

On: सोमवार, मे 4, 2026 6:04 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये आज (४ मे) मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स समोरा-समोर येणार आहेत. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात एमआयला स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक आहे. तत्पूर्वी झालेल्या सराव सत्रात एका अपघाती घटनेनंतर रोहित शर्माच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

रोहितने दुखापतीतून सावरत असून त्याने रविवारी (३ मे) नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. त्यादरम्यान त्याचा एक फटका मैदानावरील एका कर्मचाऱ्याला लागला, मात्र त्यानंतर जे घडले ते चर्चेचा विषय ठरले. कर्मचाऱ्याला त्याचा मारलेला फटका लागल्यानंतर सराव सुरू ठेवण्याचा आग्रह करूनही रोहितने तात्काळ सराव थांबवला आणि त्या जखमी कर्मचाऱ्याची विचारपूस केली. त्याला योग्य ते उपचार मिळतील याची खात्री केली.

कर्मचारी सिबन बिस्वास यांनी माध्यमांना नंतर हा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “जेव्हा रोहित सरांनी आम्हाला ऑफ-साइडची जाळी काढायला सांगितली, तेव्हा आम्ही तसे केले आणि बाजूला उभे राहिले. त्याचवेळी आजूबाजूच्या खेळाडूंकडे लक्ष देत नसताना मी दोरी गुंडाळत होतो आणि चेंडू माझ्या गुडघ्याला लागला. रोहित सर लगेच माझ्यापाशी आले आणि त्यांनी दुखापतीबद्दल विचारपूस केली. मी त्यांना त्यांचा सराव सुरू ठेवण्यास सांगितले, तरीही त्यांनी बर्फाची पिशवू आणून दिली आणि पायावर उपचारासाठी स्प्रे आणायला एकाला पाठवले.”

आयपीएलच्या १९ व्या हंगामात पाच वेळेच्या विजेत्या संघाची स्थिती खूपच वाईट आहे. त्यांनी खेळलेल्या ९ पैकी केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांना एलएसजीविरुद्ध विजय आवश्यक आहे. रोहित हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकला आहे. एलएसजीविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार की नाही हे अनिश्चित आहे, मात्र त्याने नेटमध्ये केलेला सराव पाहता तो लवकरच पुनरागमन करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

रोहितने आयपीएलमध्ये २७६ सामन्यांत ७१८३ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. तो एमआयसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने एमआयकडून २३६ डावांमध्ये खेळताना ६२८६ धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---